शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ड्युअल कॅमेरायुक्त पॅनासोनिक एल्युगा रे ५००

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 9:30 AM

पॅनासोनिक कंपनीने ड्युअल कॅमेरा असणारा एल्युगा रे ५०० हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याचे संकेत दिले आहे.

पॅनासोनिक एल्युगा रे ५०० या मॉडेलचे मूल्य ८९९९ रूपये असून हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. कंपनीने अधिकृतपणे याला लाँच केले नसले तरी फ्लिपकार्टवर याची लिस्टींग करण्यात आली आहे. यातून याच्या मूल्यासह अन्य सर्व फिचर्सची माहिती समोर आली आहे. या लिस्टींगनुसार पॅनासोनिक एल्युगा रे ५०० हे मॉडेल अनेक उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज असणारा किफायतशीर मूल्याचा स्मार्टफोन असेल. याची खासियत म्हणजे या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ५पी लेन्सयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर याच्या मागील बाजूस असणारा दुसरा कॅमेरा ६पी लेन्स आणि एफ/२.४ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. या दोन्ही कॅमेर्‍यांनी अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येतील असे कंपनीने नमूद केले आहे. या कॅमेर्‍यात एचडीआर, पॅनोरॅमीक, ब्युटी, वाईड अँगल कॅप्चर आणि नॉर्मल कॅप्चर आदी विविध मोडस् प्रदान करण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मॉडेलमध्ये ३पी लेन्स आणि एफ/२.४ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. 

पॅनासोनिक एल्युगा रे ५०० या मॉडेलमध्ये तब्बल ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची जंबो बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. मल्टी-टास्कींग करूनही ही बॅटरी दीर्घ काळापर्यंत टिकत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. उर्वरित फिचर्सचा विचार करता, यात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी ग्लासयुक्त आयपीएस ऑनसेल डिस्प्ले असेल. क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. पॅनासोनिक एल्युगा रे ५०० या स्मार्टफोनमध्ये हायब्रीड ड्युअल सीमकार्डची सुविधा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या बिग बिलीयन डे या सेलमध्ये २१ सप्टेबरपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान