नवी दिल्ली - Reliance Jio चे JioPOS Lite ॲप युजर्सना नोकरीसोबतच पैसे कमवण्याची संधी देत आहे. हे Jio Partner Programme अंतर्गत आणले गेले आहे. युजर्स याद्वारे प्रीपेड रिचार्ज केल्यानंतर कमीशन देते. याला तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या ॲपद्वारे जिओ आपल्या युजर्संना जिओ पार्टनर बनवणे किंवा अन्य जिओ ग्राहकांसाठी प्रीपेड रिचार्ज करणे आणि पैसे कमवण्याची परवानगी देते. याचे रजिस्ट्रेशन खूपच सोपे आहे. जाणून घ्या या ॲप संबंधी हे कसे काम करते.
काय आहे JioPOS लाइट?
हे एक रिचार्ज करण्याचे प्लॅटफॉर्म आहे. हे ॲप माय जिओ ॲप किंवा जिओ वेबसाइटसारखे आहे. JioPOS Lite तुम्हाला ॲपच्या माध्यमातून प्रत्येक रिचार्जवर कमिशन कमवण्याची संधी देते. याच्या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी कोमत्याही फिजिकल डॉक्यूमेंट्सची गरज पडत नाही. तुमच्याकडे फक्त जिओ नंबर असायला हवा.
किती मिळेल कमिशन?
या ॲपद्वारे जर तुम्ही रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला प्रत्येक रिचार्जवर 4.1 टक्के कमिशन मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 हजार रुपयाचे रिचार्ज केले तर तुम्हाला यावर 41.6 रुपये कमिशन दिले जाईल.
असे कमवा पैसे
- सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store द्वारे अँड्रॉईडसाठी JioPOS Lite ॲप डाउनलोड करावे लागेल.
- एकदा ॲप डाउनलोड झाल्यानंतर याला आवश्यक परवानगी द्या. पुन्हा जिओ पार्टनर बनवण्यासाठी आपला जिओ नंबर आणि ईमेल आयडीला लॉगइन करा.
- रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ॲपच्या वॉलेट मध्ये 500 रुपये, 1 हजार रुपये, आणि 2 हजार रुपये ॲड करावे लागतील.
- यानंतर तुम्ही जितके रिचार्ज कराल त्यावर तुम्हाला 4.16 टक्के परत मिळतील.
या ॲपमधून बँक डिटेल्स मागितली जात नाही. तुमचे कमिशन ॲपच्या वॉलेटमध्ये जमा होते. याचा वापर बाकीच्या रिचार्जसाठी करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.