Easyfone ने भारताचा पहिला आणि ट्रूली Rugged Phone अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन स्क्रॅच, ड्रॉप आणि वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. हा एक फिचर फोन आहे जो Easyfone Shield नावाने सादर करण्यात आला आहे. हा फोन कंपनीने IP68 सर्टिफिकेशनसह सादर केला आहे. चला जाणून घेऊया Easyfone Shield फीचरची किंमत आणि स्पेसिफिकेशन.
Easyfone Shield ची किंमत
Easyfone Shield ची किंमत मात्र एखाद्या फिचरफोनला साजेशी नाही. हा फोन कंपनीने 6,499 रुपयांमध्ये सादर केला आहे. इजिफोन शिल्ड Black आणि Orange कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हा डिवाइस ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टच्या माध्यमातून ऑनलाइन विकत घेता येईल.
Easyfone Shield चे स्पेसिफिकेशन्स
Easyfone Shield फोनमध्ये 2.8 इंचाचा IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 320 x 240 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच या फोनमध्ये 32MB रॅम आणि 32MB ची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 32GB पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये फ्लॅशसह 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करत नाही.
हा एक 2G सपोर्टेड फोन आहे, ज्यात कनेक्टिव्हिटीसाठी GPRS, Micro USB Port, Bluetooth Support, Wi-Fi आणि 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे. तसेच Easyfone Shield मधील 2500 mAh ची बॅटरी फोनला पावर तर देतेच परंतु इतर डिव्हाइसेससाठी पावर बँकचे देखील काम करू शकते. हा भारताचा पहिला ट्रूली रगेड फोन आहे, असा दावा कंपनीने केला आहे.