घराचे वीज बील हे बऱ्याच लोकांसाठी डोकेदुखी बनले आहे. यामुळे बरेच जण घराचे वीजबील कमी कसे येईल, यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, काही डिव्हाइसचा सातत्याने वापर केल्याने हे शक्य होत नाही. यामुळे घरातील काही डिव्हाइसचा वापर बंद केल्यानंतर अथवा त्याला पर्याय शोधल्यास, आपण घराचे वीज बील मोठ्या प्रमाणावर कमी करू शकता. तसेच यामुळे आपल्याला काही त्रासही होणार नाही.
किचनमधील चिमनी हटवा - आपल्या स्वयंपाक घरात बऱ्याच वेळा चिमनीचा वापर केला जातो. मात्र, ही चिमनी सर्वाधिक वीज लागणाऱ्या डिव्हाईसच्या यादीत सामील आहे. यामुळे वीजबील मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत चिमनीचा वापर करणे अनेक वेळा आवश्यक बनते. मात्र, या चिमनीला पर्याय म्हणून अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे आपले वीज बील मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
गिझरलाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते - घरात गिझरलाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते. यामुळे विजेवर चालणारे गिझर हे आपल्यासाठी डोकेदुखीही ठरू शकते. यामुळे याला काही तरी दुसरा पर्याय निवडणेच योग्य आहे. याला गॅस गिझर हा एक चांगला पर्याय आहे. विजेच्या गिझर ऐवजी आपण गॅस गिझरचा वापर करू शकता.
Inverter AC -घरातील AC देखील सर्वाधिक वीज लागणाऱ्या डिव्हाइसच्या यादीत आहे. मात्र, हे एक असे डिव्हाइस आहे. जे आपण घरातून काढूही शकत नाही. मात्र, आपण Non-Inverter AC ऐवजी Inverter AC चा वापर करू शकता. Inverter AC चा अर्थ, हा एसी वीज वाचविण्यासाठी बेस्ट आहे. कारण याच्या आउटडोरमध्ये PCB लावलेला असतो. जो कॉम्प्रेसरची स्पीड रेग्युलेट करतो. कंपन्यांचा दावा आहे, की Inverter AC 15 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत करतो.