Tesla आणि SpaceX चे सीईओ इलॉन मस्क यांचं कार प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान लॉन्च करणारे मस्क हे जेम्स बॉण्डचेही चाहते आहेत. याच प्रेरणेतून त्यांनी 1976 Lotus Esprit 007 Wet ही जबरदस्त कार खरेदी केली होती. पाण्याच्या आत शूटिंग करता येईल यासाठी एक खास कार चित्रपट निर्मात्यांनी बनवली होती. मस्क यांना याच कारचं वेड लागलं आणि त्यांनी २०१३ साली आपल्या प्रतिनिधीमार्फत बोली लावत लिलावात तब्बल ७.५ कोटी रुपयांना कार खरेदी केली होती.
इलॉन मस्क यांनी त्यांच्या Cybertruck चं डिझाइन Blade Runner आणि Lotus Esprit वरुन घेण्यात आल्याचं सांगितलं होतं. Lotus Esprit कारचा वापर James Bond in The Spy Who Loved Me या चित्रपटात केला गेलो होता. ही कार पाणबुडीसारखं काम करते. इलॉन मस्क यांच्याकडे Lotus Esprit व्यतिरिक्त आणखी जबरदस्त कारचं कलेक्शन आहे. मस्क यांच्याकडे स्वत:च्या टेस्ला कंपनीच्या कारचं भन्नाट कलेक्शन आहे. यात ते Tesla Model S Performance या कारचा सर्वाधिक वापर करतात असं त्यांनी स्वत: एकदा सांगितलं होतं.
याशिवाय मस्क हे Tesla Model X SUV या कारचाही वापर करतात. तसंच Tesla Cybertruck देखील त्यांच्या ताफ्यात आहे. मस्क यांच्याकडे टेस्ला रोडस्टर देखील आहे. टेस्ला व्यतिरिक्त ते इतर महागड्या कार देखील वापरतात. मस्क यांच्याकडे 2012 Porsche 911 Turbo कार देखील आहे. ही त्यांची आवडती कार असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. आजवरच्या सर्वात बेस्ट कारमध्ये या कारचा त्यांनी समावेश केला आहे. मस्क टर्बो 911 या कार मॉडेलचे चाहते आहेत.
मस्क यांच्याकडील कलेक्शनमध्ये क्लासिक 1920 फोर्ड मॉडेल टी देखील आहे. मस्क 1967 जग्वार ई-टाइप देखील वापरतात. ते वयाच्या १७ वर्षीच या कारच्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून ही कार त्यांची ड्रीमकार बनली होती. जी त्यांनी नंतर विकतही घेतली. याशिवाय मस्क हे बीएमडब्ल्यूचेही चाहते आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये 2006 Hamann BMW M5 देखील आहे.