ट्विटर इलॉन मस्क यांच्या ताब्यात आल्यापासून ट्विटरमध्ये मोठे बदल झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना मस्क यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तर ब्लू टीकसाठी पैसेही आकारले आहेत. आता Twitter वापरकर्त्यांना मस्क यांनी आणखी एक झटका दिला आहे.
केंद्र सरकारने 14 मेसेंजर अॅप्सवर घातली बंदी, दहशतवादी पाकमधून मेसेज पाठवण्यासाठी करत होते वापर!
'आता या महिन्यापासून वृत्त संस्था वापरकर्त्यांना त्यांचे लेख वाचण्यासाठी शुल्क आकारू शकतील. त्यांना प्रति क्लिक शुल्क आकारण्याची परवानगी दिली जाईल. हे फीचर लाँच केल्यानंतर, ते वापरकर्ते लेख देखील वाचू शकतील, ज्यांचे मासिक सदस्यता नाही आणि अधूनमधून एखादा लेख वाचायचा आहे. अशा वापरकर्त्यांना प्रति लेख शुल्क भरावे लागेल, असं इलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.
कंटेंट प्रोडक्शनकर्त्यांना यातून पैसे कमवता यावेत यासाठी या फिचरसह, ट्विटरचे उद्दिष्ट मीडिया हाऊसेसना मंदीच्या काळात मदत करण्याचे आहे, मंदीमुळे अनेक संस्थांमध्ये टाळेबंदी झाली आहे. यापूर्वी ट्विटरने म्हटले होते की, जगभरातील निर्माते आता 'कमाई' टूलद्वारे ट्विटरवर साइन अप करून कमाई करू शकतात. याद्वारे, ज्यांचे किमान ५०० फॉलोअर्स आहेत त्याच संस्था पैसे कमवू शकतील. अकाउंटला ब्लू टीक असले पाहिजे तसेच ते गेल्या ३० दिवसांपासून सक्रिय असले पाहिजे. मस्क म्हणाले की, संपूर्ण उत्पन्न सामग्री त्या संस्थांना दिली जाईल आणि यासाठी ट्विटर सध्या कोणतेही शुल्क आकारणार नाही, असंही मस्क यांनी म्हटले आहे.
ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रजा १४० वरून १४ केली आहे. यापूर्वी, कर्मचाऱ्यांना २० आठवड्यांची रजा मिळत होती. हा बदल अशा लोकांसाठी मोठा धक्का आहे, ज्यांचे सशुल्क रजा धोरण यूएस राज्यांमध्ये लागू नाही.