Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत टॉपवर राहिलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यासाठी वाईट दिवस सुरू झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मस्क आता दुसऱ्या स्थानावर आले आहेत. पहिल्या स्थानावर बर्नाड अरनॉल्ट (Bernard Arnault) गेले आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, बर्नाड अरनॉल्ट यांची संपत्ती 161 अब्ज डॉलर झाली आहे, तर मस्क यांची संपत्ती 148 अब्ज डॉलरवर आली आहे. तिसऱ्या नंबरवर गौतम अदानी (Gautam Adani) आहे. अदानींची संपत्ती (Adani networth) 127 अब्ज डॉलर आहे. मस्क यांच्या संपत्तीत सतत घट होताना दिसत आहे. सध्या त्यांची संपत्ती गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी पातळीवर आली आहे.
24 तासात 63000 कोटींचे नुकसानइलॉन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासात 7.7 बिलियन डॉलर (63000 कोटी रुपये) घट झाली आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा मिळवल्यापासून टेस्ला इंकचे शेअर (Tesla inc share) पडत आहेत. इलॉन मस्क सर्वात आधी 13 डिसेंबर रोजी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानवर आले होते. यानंतर ते पहिल्या स्थानावर परत गेले. पण, आता परत एकदा ते दुसऱ्या स्थानावर आले आहेत.
ट्विटरचे CEOपद सोडणार ?51 वर्षीय इलॉन मस्क लवकरच ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देऊ शकतात. मस्क यांनी त्यांच्या ताज्या ट्विटमध्ये म्हटले की, त्यांना या पदासाठी कुणी लायक व्यक्ती मिळाल्यावर पद सोडेल. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “जेव्हा मला या कामासाठी मूर्ख व्यक्ती सापडेल तेव्हा मी सीईओ पद सोडेन! यानंतर मी फक्त सर्व्हर आणि सॉफ्टवेअर टीम हाताळणार आहे.'' विशेष म्हणजे, एक दिवसापूर्वी मस्क यांनी ट्विटर पोलद्वारे लोकांना विचारले होते की, त्यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडावे की की नाही. ज्यामध्ये 58% लोकांनी होय असे उत्तर दिले.