मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा मालक इलॉन मस्क सध्या दिवसेंदिवस लोकप्रियतेत घट होत असल्यानं खूप त्रस्त आहे. रिपोर्टनुसार, इलॉन मस्कनं आपल्या ट्विट्सचा रिच वाढवण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं एक सिस्टम तयार करण्यास सांगितलं आहे. मस्कचा चुलत भाऊ जेम्स मस्कनं कथित पद्धतीनं ट्विटरवर एन्गेजमेंटच्या समस्येबाबत डेव्हलपर्सना सतर्क करण्यासाठी मध्यरात्री दोन वाजता मेसेज पाठवला होता. दरम्यान, मस्कनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि इलॉन मस्क यांनी सुपर बाउल फुटबॉल सामन्याबाबत ट्विट केले होते. बायडन यांच्या ट्विटला मस्कच्या ट्विटपेक्षा जास्त लाईक्स मिळाले. द प्लॅटफॉर्मर वृत्तपत्राचा हवाला देत 'द चेनलॉ' रिपोर्टने दावा केला आहे की ज्यो बायडन यांच्या ट्विटपेक्षा मस्क यांच्या ट्विटला कमी पसंती मिळाल्याने मस्क खूप नाराज होते.
नोकरी गमावण्याची धमकीज्यो बायडन आणि इलॉन मस्क यांनी सुपर बाउल फुटबॉल सामन्यादरम्यान फिलाडेल्फिया ईगल्सच्या समर्थनार्थ ट्विट केलं. बायडन यांच्या ट्विटला २९ कोटी इंप्रेशन मिळाले, तर मस्कच्या ट्विटला (जे आता हटवले गेले आहे) फक्त ९१ लाख इंप्रेशन मिळाले होते. यानंतर मस्कने आपल्या इंजिनिअर्सना अल्टिमेटम दिला की, त्यांच्या ट्विटला अधिक इंप्रेशन मिळावेत, अन्यथा त्यांना काढून टाकण्यात येईल.
आरोप फेटाळलेट्विटरच्या सीईओ मस्कनं आरोपांचं खंडन केलं आहे. प्लॅटफॉर्मर लेखाची माहिती देणारा हा असंतुष्ट कर्मचारी असून कंपनी माजी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले. मस्कनं मीडियाच्या दाव्याचं खंडन केलं.