शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळांची महत्वाची प्रतिक्रिया 
2
गौतम अदानी होऊ शकतात जगातील दुसरे ट्रिलिनेअर, पहिल्या क्रमांकावर कोण?
3
मुंबईत अमित शाह यांची हाय व्होल्टेज बैठक: सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना दिले ७ कानमंत्र
4
Sanjay Raut : "अमित शाह पुढच्या वर्षी 'लालबागचा राजा' गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना?, देवच पळवायचे..."
5
Kolkata Doctor Case : "मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा माझा थरकाप होतो..."
6
अरे देवा! झोपेत असतानाच नाकात घुसले झुरळे, बाहेर काढण्यासाठी लागले तीन दिवस
7
बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर
8
घरात येताच संग्रामचा थेट निक्कीशी पंगा, टास्कमध्ये अभिनेत्रीला पाण्यात ढकललं अन्...; आता काय होणार?
9
"आई, मला माफ कर"; १४ वर्षांच्या मुलाने शाळेत केला गोळीबार, चौघांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली; मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तरपणे सांगितलं कारण!
11
भारतासाठी महत्वाची बातमी; बांग्लादेश सरकारने रोहिंग्यां मुस्लिमांबाबत घेतला मोठा निर्णय
12
बॉडीगार्डनेच केला चुकीचा स्पर्श अन्..., 'बालिका वधू' फेम अविका गौरचा धक्कादायक खुलासा
13
'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली
14
'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम विकास सेठीचं निधन, पत्नीनं शेअर केली इमोशनल पोस्ट
15
"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
16
Rishabh Pant on Rohit Sharma: "मैदानात ठीक आहे पण मैदानाबाहेर..."; रिषभ पंतने रोहित शर्माबाबत मांडलं रोखठोक मत
17
पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एका आरोपीला पोलिसांकडून अटक
18
जम्मू-काश्मीरच्या राजौरीत घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
19
१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज
20
Gauri Puja 2024: १० सप्टेंबर रोजी गौरी आवाहनाचा मुहूर्त आणि सविस्तर विधी जाणून घ्या!

Twitter मधून होणार तगडी कमाई! YouTube पेक्षा चांगली सिस्टम आणणार, कसं ते मस्क यांनीच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 11:38 AM

इलॉन मस्क यांचा ट्विटरबाबतचा प्लान आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. कंपनी लवकरच यातून कंटेंन्ट क्रिएटर्सना देखील पैसे कमावण्याची संधी देणार आहे.

नवी दिल्ली-

इलॉन मस्क यांचा ट्विटरबाबतचा प्लान आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. कंपनी लवकरच यातून कंटेंन्ट क्रिएटर्सना देखील पैसे कमावण्याची संधी देणार आहे. मस्क यांनी याबाबत सर्व माहिती स्पष्ट केली आहे. येत्या काळात युझर्स ट्विटरवर मोठे व्हिडिओ देखील पोस्ट करू शकणार आहेत. ट्विटर सध्या अशा मॉनिटायजेशन प्लानवर काम करत आहे की ज्यापुढे यूट्यूब देखील फेल ठरू शकतं. 

रिपोर्ट नुसार कंपीनी सर्व प्रकारच्या कंटेंन्ट क्रिएटर्सना कमाईची संधी देणार आहे. म्हणजेच व्हिडिओशिवाय इतर कंटेंन्टमधूनही युजर्स पैसे कमावू शकणार आहेत. यूट्यूबकडून क्रिएटर्सना ५५ टक्के अॅड रेवेन्यू दिला जातो असं ट्विट एका युझरनं केलं होतं. त्यावर खुद्द इलॉन मस्क यांनीच आम्ही लवकरच याला मागे टाकू असं म्हटलं होतं. त्यावरुनच मस्क यांनी ट्विटरच्या मॉनिटायझेशनबाबत संकेत दिले होते. 

यूट्यूबपेक्षा दमदार असणार ट्विटरचं मॉनिटायजेशन यूट्यूब सारखंच जर ट्विटरवर मॉनिटायजेशन मिळालं तर यूझर्स मोठे व्हिडिओ ट्विटरवरही शेअर करू लागतील असं एका युझरनं ट्विट केलं. त्यावर मस्क यांनी रिप्लाय देत ब्लू सब्सक्रिप्शनसाठी आम्ही आता ४२ मिनिटांचा आणि १०८० रेज्युलेशनचा व्हिडिओ ट्विट करू शकत आहोत. येत्या महिन्यात याची मर्यादा निश्चित केली जाईल असं म्हटलं. आता मॉनिटायजेशनबाबत येत्या काळात मस्क सविस्तर माहिती देऊ शकतात. याशिवाय मोठा मजकूर ट्विटला अटॅच करण्याचं फिचर देखील लवकरच आणलं जाईल. तसंच कंटेंन्टमधूनही यूझरला पैसा मिळू शकतो. 

मस्क यांनी ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटरची डील पक्की करत मालकी हक्क प्राप्त केला आहे. ट्विटरचा ताबा मिळताच मस्क यांनी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. तसंच ब्लू सब्सक्रिप्शन आणखी काही देशांमध्ये जारी करण्यात आलं आहे. यात युझर्सना वेगवेगळे फिचर्स ऑफर केले जाणार आहेत. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर