भारतात स्वस्तात इंटरनेट डेटासाठी काही वर्षांपूर्वी कंपन्यांच्या रांगा लागल्या होत्या. Reliance Jio ने सर्वांना दणका दिला होता. काही कंपन्या बंद झाल्या. काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आता याच रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत. रिलायन्स जिओपेक्षा स्वस्त आणि वेगवान डेटा उपलब्ध करण्याची तयारी मस्क यांनी केली आहे.
मस्क Starlink प्रोजेक्ट भारतात लाँच करणार आहेत. सॅटेलाईटद्वारे गावा गावात, जंगलात, दुर्गम भागांत इंटरनेट मिळू शकणार आहेत. यामुळे सध्याची आघाडीची इंटरनेट पुरविणारी कंपनी रिलायन्स जिओला जोरदार टक्कर मिळणार आहे. सॅटेलाईटद्वारे रेंज मिळणार असल्याने जागोजागी टॉवर उभारण्याची गरज राहणार नाही, नाही जागेची. घराघरात डीटीएच सारखा अँटिना बसविला की हव्या त्या स्पीडने इंटरनेट वापरता येणार आहे.
यासाठी कंपनी काही रक्कम जमा करवून घेत आहे. गावागावात फास्ट इंटरनेट देण्यासाठी भारतीय टेलिकॉम कंपनीसोबत हातमिळवणी करण्याचा प्लॅन तयार केला जात आहे. Live Mint च्या रिपोर्टनुसार स्टारलिंक सर्व्हिस भारतात इंटरनेट सर्व्हिसवर सबसिडीद्वारे किंमत देऊ शकते. Reliance Jio आणि Jio Fiber ला स्टारलिंककडून जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
कंपनी दुर्गम भागात कमी किंमतीत इंटरनेट सेवा लाँच करण्यासाठी काम करत आहे. या भागात सध्या ही इंटरनेट सेवा पुरविणे कठीण आहे. Starlink India चे संचालक संजय भार्गव यांनी सांगितले की, कंपनी सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा देमार आहे. सध्या भारतातून 5000 प्री ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनी प्री ऑर्डर करण्यासाठी 7350 रुपये घेत आहे. कंपनी 50 ते 150 एमबीपीएस वेगाने इंटरनेट डेटा देईल असे सांगितले जात आहे. तर लो ऑर्बिटमध्ये Starlink सॅटेलाईट सॅटेलाईट स्थापन झाला की त्याचा वेगवाढून 1Gbps होणार आहे.