इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर कंपनीतील सुमारे ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. याबाबत आता थेट इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. काढून टाकण्यात आलेली कर्मचारी संख्या ही एकूण कर्मचारी संख्येपेक्षा निम्मी आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात करण्यात आलेल्या दाव्यानुसार सॅन फ्रान्सिस्को फेडरल कोर्टात गुरुवारी मस्क यांच्या विरोधात क्लास-अॅक्शन खटला दाखल करण्यात आला आहे.
ट्विटरमध्ये Work From Anywhere पॉलिसी बंद होणार, कर्मचाऱ्यांना कामावर परतावं लागणार!
ट्विटरने आपल्या कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची माहिती देणारे ईमेल पाठवले होते. कंपनीनं नुकतंच स्लॅक आणि अधिकृत ईमेल सारख्या अंतर्गत सेवांमधून अनेक संशयास्पद कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर त्यांना ट्विटरच्या वेतनातून काढून टाकल्याची घोषणा केली.
इलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना धक्का; चिनी मातीचे बेसिन घेऊन पोहोचले मुख्यालयात
बहुतांश अमेरिकन मीडिया कंपन्यांनी प्रसारित केलेल्या अंतर्गत मेलनुसार, ट्विटर कर्मचार्यांना घरीच राहण्यास सांगण्यात आलं आणि जे ऑफिसला जात होते त्यांना परत जाण्यास सांगण्यात आलं आहे. ट्विटरनं कामावरुन काढलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश बंदी केली आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे की त्यांना कायम ठेवण्यात आले आहे, याची माहिती देण्यात येईल, असं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ज्यांना काढून टाकण्यात आलं आहे त्यांच्या वैयक्तिक ईमेल आयडीवर मेल पाठवला जाईल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
कंपनीत सुरू असलेल्या कपातीची चर्चा करण्यासाठी कर्मचारी एनक्रिप्टेड आणि निनावी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. रॉयटर्सच्या अहवालात एका वरिष्ठ कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार प्रशासन कर्मचाऱ्यांचा मागोवा घेत आहे. ज्या कर्मचार्यांना काढून टाकलेलं नाही त्यांनी देखील त्यांच्या माजी सहकाऱ्यांना रेफरल्स, आपल्या ओळखीनं मदत करण्याचं वचन दिलं आहे.
ट्विटरने आतापर्यंत कर्मचारी कपातीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आधीच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास तयार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"