Elon Musk Twitter Deal: गेल्या महिन्यापासून ट्विटर आणि इलॉन मस्क सतत चर्चेत आहेत. मस्क यांनी $44 बिलियनमध्ये ट्विटर विकत घेतले. मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यानंतर, ट्विटरमध्ये नवीन फीचर्स आणले जातील, असा अंदाज लावला जात आहे. यापैकी एक फीचर म्हणजे एडीट बटण. अनेकजण या फीचरसाठी आग्रही आहेत. यात मस्क यांच्या आईचादेखील समावेश आहे. अनेकांप्रमाणे आता इलॉन मस्क यांच्या आईनेही ट्विटरकडे एडीट बटनाची मागणी केली आहे.
इलॉन मस्कच्या आईची मागणीजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांची आई माये मस्क यांनी ट्विटरकडे एडीट बटनाची मागणी केली आहे. माये मस्क यांनी ट्विटरवर ताजमहालचा एक फोटो ट्विट केला होता, ज्यामध्ये त्यांनी 2007 मध्ये ताजमहालला भेट दिल्याची माहिती दिली होती. पण, नंतर हे ट्विट रिट्विट करत त्यांनी 2007 मध्ये नाही तर 2012 मध्ये गेल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी एडिट बटण कुठे आहे, अशी विचारणा केली.
माये मस्कच्या ट्विटला उत्तर देताना एका यूजरने लिहिले की, आई बोलली, आता करावंच लागेल. दरम्यान, ट्विटर यूझर्स बऱ्याच काळापासून एडिट बटणाची मागणी करत आहेत. काही रिपोर्टनुसार, एटीड बटणाचे फीचर सुरुवातीला ब्लू टीक यूझर्ससाठी असेल.