Elon Musk X Changes : जगभरातील सेलिब्रिटी, लीडर, बिझनेसमन ते सामान्य माणसापर्यंत...अनेकजण X चा वापर करतात. प्रत्येक देशात याचे वापरकर्ते आहेत, यावरुनच त्याची लोकप्रियता मोजली जाऊ शकते. X पूर्वी Twitter म्हणून ओळखले जायचे, पण अब्जाधीश इलॉन मस्क यांनी Twitter विकत घेतल्यानंतर त्यात अनेक बदल केले. सर्वात मोठा बदल म्हणजे, ट्विटरचे नाव बदलून एक्स(X) केले. त्यानंतरदेखील त्यांनी यात अनेक बदल केले आहेत. दरम्यान, आता यात नवीन बदल करण्यात आला आहे.
इलॉन मस्क यांनी दिली माहितीइलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्टमध्ये खूप बोल्ड फॉन्ट वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, अशा पोस्ट यापुढे मुख्य टाइमलाइनवर दर्शविल्या जाणार नाहीत. बोल्ड फॉन्टद्वारे युजरला त्यांच्या पोस्टमधील काही भाग हायलाइट करता येतो. पण, त्याचा जास्त वापरर केल्यास पोस्टचे आकर्षण कमी होऊ शकते, असेही मस्क यांनी सांगितले.
युजर्सना काय करावे लागेल?हा बदल त्वरित लागू होईल. याचा अर्थ असा की, बोल्ड फॉरमॅट केलेला कोणताही मजकूर मेन टाइमलाइनवर दाखवला जाणार नाही. युजर्सना बोल्ड पोस्ट पाहण्यासाठी वैयक्तिक पोस्टवर क्लिक करावे लागेल. हे अपडेट केवळ वेब वापरकर्त्यांसाठीच लागू नाही, तर iOS आणि Android ॲप वापरकर्त्यांसाठीदेखील लागू केले आहे.