Twitter CEO: इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचे (Twitter) सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी ट्विटरसाठी एका महिला सीईओ निवड केली आहे. नवीन सीईओ येत्या 6 आठवड्यात काम सुरू करणार असल्याची माहितीही मस्क यांनी दिली. मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहतील.
ट्विटरच्या सीईओपदी असेल महिला आपल्या पायउतार होण्याच्या निर्णयाबद्दल माहिती देताना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सापडला आहे. त्यांनी या महिलेचे नाव सांगितले नसले तरी मीडिया रिपोर्टमधून एका महिलेचे नाव समोर येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, कॉमकास्ट एनबीसी युनिव्हर्सलची कार्यकारी लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) हिच्याशी इलॉन मस्क सध्या चर्चा करत आहेत.
मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “मी Twitter साठी नवीन CEO शोधला आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद होतोय. ती 6 आठवड्यांत काम सुरू करेल. तसेच, ट्विटरचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहणार आहे.''
ट्विटरवर व्हॉईस आणि व्हिडिओ चाटयाआधी 11 मे रोजी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एन्क्रिप्टेड मेसेजिंग सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. ट्विटमध्ये ते म्हणाले, “एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेजची सुरुवातीची आवृत्ती नुकतीच लॉन्च झाली आहे. एकदा वापरून पहा, परंतु अद्याप त्यावर विश्वास ठेवू नका." ट्विटर आगामी काळात आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट सादर करणार आहे.