शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Facebook Server फेलमुळे कर्मचाऱ्यांची ॲक्सेस कार्डही बंद, लॉक तोडून गेले सर्व्हर रूममध्ये; समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 9:17 AM

Facebook, WhatsApp and Instagram Server Down: समोर आलं Facebook Server बंद होण्याचं कारण. संपूर्ण जगाला तब्बल ११९२.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान. 

ठळक मुद्देसमोर आलं Facebook Server बंद होण्याचं कारण. संपूर्ण जगाला तब्बल ११९२.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान. 

व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर (Whatsapp, Instagram, Facebook and facebook messenger) पुन्हा सुरू झालं आहे. तब्बल सहा तास या तिन्ही सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडणींमुळे या तिन्ही सेवा बंद पडल्या होत्या. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली होती. परंतु आता या सेवा का बंद झाल्या याचं कारण आता समोर आलं आहे. 

फेसबुक आणि इन्स्टाग्राम सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद राहिल्यानंतर भारतीय वेळेनुसार ते ३ वाजून २४ मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आलं. तर दुसरीकडे Whatsapp तब्बल ७ तासांनंतर म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी सुरू झालं. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या तिन्हीवर फेसबुकचं स्वामित्व आहे. यामुळे या तिन्हीचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहे. 

या तिन्ही सेवा बंद होण्यामागचं कारण Facebook चं DNS म्हणजेच Domain Name System फेल होणं होतं. DNS फेल झाल्यामुळे फेसबुकपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या युझर्सचा इंटरनेट रूट बाधित झाला. DNS कोणत्याही वेबसाईटला आयपी ॲड्रेसमध्ये ट्रान्सलेट करुन युझरला त्या पेजपर्यंत पोहोचवतो, जे पेज त्या युझरला उघडायचं आहे.

का फेल झाला DNS ?फेसबुकचा DNS फेल होण्यामागे जाणकारांच्या मते Facebook चे सर्व BGP (Border Gateway Protocol) थांबले होते. यामुळे सर्व DNS फेल झाले आणि संपूर्ण जगात फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम ठप्प झाले. BGP रुटच्या मदचीनं DNS आपलं काम करतो. परंतु BGP थांबवण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

कर्मचाऱ्यांनाही समस्याया तिन्ही सेवा ज्यावेळी बंद झाल्या त्यावेली फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागला. त्यांच्या कार्यालयाची मेल सिस्टम आणि कर्मचाऱ्यांच्या ॲक्सेस कार्डनंही काम करणं बंद केलं होतं.  यानंतर फेसबुकचे मुख्यं तंत्रज्ञान अधिकारी माईक स्करोपफेरनं लोकांची माफीही मागितली.लॉक तोडून सर्व्हर रूममध्येअंतर्गत मेल सिस्टम बंद झाल्यानं आणि कर्मचाऱ्यांचं ॲक्सेस कार्ड न चालत असल्यानं फेसबुकनं आपल्या कॅलिफोर्नियाच्या सँटा क्लारा डेटा सेंटरवर एक टीम पाठवली. बंद पडलेले सर्व्हर मॅन्युअली रिसेट करण्या करण्यासाठी आणि सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी देखील अॅक्सेस कार्ड न चालल्यानं टीमला सर्व्हर रूमचे लॉक तोडून आत जावं लागलं. समस्या दूर करण्यासाठी त्यांना फिजिकल अॅक्सेस आवश्यक होतं.  कोट्यवधींचं नुकसानया समस्येदरम्यान, फेसबुकनं अंतर्गत मेमो जारी केला आणि हा प्रकार जोखीम असलेला आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला जोखीम पोहोचवणारा असल्याचं म्हटलं. फेसबुकच्या महसूलात या समस्येमुळे या कालावधीत तब्बल ८० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५९६ कोटी रूपयांचे एकूण नुकसान झालं. तसं इंटरनेटवरील ग्लोबल ओब्झर्व्हरी 'नेटब्लॉक्स'च्या अंदाजानुसार संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला या समस्येमुळे १६० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ११९२.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान झालं होतं.

टॅग्स :FacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया