देशात सध्या 5G चे वारे सुरु असताना आता फायबर ब्रॉडबँड विश्वास एका नव्या कंपनीने पाय रोवले आहेत. यामुळे रिलायन्स जिओ, एअरटेल या फायबर ब्रॉडबँड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना धडकी भरली आहे. या दिग्गज कंपन्या ३०, ४० एमबीपीएसचे प्लॅन ३९९, ४९९ रुपयांना देत असताना नव्या कंपनीने ४०० एमबीपीएस हायस्पीड इंटरनेट महिन्याला ५९९ रुपयांत देण्यास सुरुवात केली आहे.
एक्सायटेलने देशभरातील पाच शहरांनंतर आता मुंबईत एन्ट्री केली आहे. दिल्ली, हैद्राबाद, बँगलोर या शहरांमध्ये ही कंपनी सेवा देत आहे. दुसरीकडे रिलायन्स जिओचे फायबर जाळे अद्याप मुंबई, पुणे सारख्या शहरांतील अनेक भागात पोहोचलेले नाही. यामुळे अशा काळातच एक्सायटेलने जास्त वेगवान इंटरनेट आणि स्वस्तात सेवा सुरु केल्याने फायबर ब्रॉडबँड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.
मुंबईत या कंपनीने आधी पायलट प्रोजेक्ट राबविला होता. यानंतर या कंपनीने अन्य शहरांमध्ये विस्तारण्याची योजना आखली आहे. याकंपनीने ४०० एम. बी. पी. एस. व्यतिरिक्त, एक्सायटेल २०० एम. बी. पी. एस. आणि ३०० एम. बी. पी. एस. स्पीडसह डेटा प्लॅन जाहीर केले आहेत.
कालावधी ४०० एम. बी. पी. एस.३ महीने रुपये ८३३/- प्रति महिना६ महीने रुपये ६९९/- प्रति महिना९ महीने रुपये ६५९/- प्रति महिना१२ महीने रुपये ५९९/- प्रति महिना
देशात इतर कंपन्या १ एम. बी. पी. एस. चा स्पीड देत होत्या त्यावेळेला आम्ही सर्वात आधी २० एम. बी. पी. एस. चा स्पीड इंटरनेट यूजर्सना देत होता. आता आम्ही भारतीय इंटरनेट यूजर्सना ४०० एम. बी. पी. एस. चा हायस्पीड देत आहोत जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या मनोरंजन. खेळ, शिक्षण, आणि कामकाजात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये, असे एक्सायटेल प्रमुख विवेक रैना म्हणाले.