नवी दिल्ली - जगभरातील सर्वात प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकवर संकटाचे वादळ घोंगावत आहे. कधी राजकीय पक्षांच्या डेटामध्ये बदल केल्याचा तर कधी 5 कोटी युजर्संच्या अकाऊंट हॅकिंगचा मुद्दा समोर आल्याने फेसबुकच्या विश्वार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या सर्व बाबींमुळे कंपनीला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, हे असेच सुरू राहिल्यास फेसबुक कायमचे बंद पडायला वेळ लागणार नाही.
डेव्हीड कर्कपॅट्रीक नावाच्या लेखकाने 2010 मध्ये फेसबुवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये कर्कपॅट्रीक यांनी संभाव्य धोक्याची अगोदरच माहिती दिली आहे. त्यामुळे कंपनीला अशाप्रकारे युजर्संच्या सुरक्षेचा सामना करावा लागल्यास, लवकरच जाहिरातदार फेसबुकवर जाहिरात देण्याचे बंद करतील. सन 2012 मध्ये जेव्हा फेसबुकने इंस्टाग्रामला विकत घेतले. त्यावेळी, हा मोठा जुगार मानण्यात येत होता. पण, 6 वर्षानंतर मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपसह आता इंस्ट्राग्रामलाही आगामी काळात फेसबुकच्या तुलनेत सुरक्षित नेटवर्क म्हणून पाहिले जाते.
दरम्यान, सोशल मीडिया नेटवर्कींग कंपन्यांना राजकीय हस्तक्षेप, खासगी तक्रारी, फेक न्यूज आणि हॅकिंगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या साईट नेहमीच चर्चेचा विषय बनतात. या सर्व बाबींचा संदर्भ देत डेव्हीड कर्कपॅट्रीक यांनी फेसबुकचा नायनाट होऊ शकतो, असे भाकित केलं आहे. राजकीय दबाव आणि हस्तक्षेपामुळे जाहिरातदार अंग काढून घेतील. हे सध्या शक्य नसलं तरी आगामी काळात घडू शकते, असे कर्कपॅट्रीक यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले. तसेच, जाहिरातदार इंस्ट्राग्रामकडे वळतील, असेही ते म्हणाले आहेत.