नवी दिल्ली - फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 60 कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला आहे त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या काही जुन्या पोस्ट डिलीट झाल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकने आपल्या पोस्टमध्ये टीमकडून चुकून डिलीट झाल्याचे स्पष्ट केले आहे.
फेसबुकडून आता मार्क झुकेरबर्ग याच्या 2007 आणि 2008 या दोन वर्षांतील काही पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यामुळे झुकेरबर्ग याचे अकाऊंट सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य युजर्सचं काय, असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे. दरम्यान या सर्व पोस्ट चुकून डिलीट झाल्या असून त्या कंपनीच्या ब्लॉग किंवा न्युजरूममध्ये मिळू शकतील अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली आहे.
Facebook अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित आहे का?; 'या' सिक्युरिटी टिप्स करतील मदत!क्रेब्स ऑन सिक्युरिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फेसबुकने युजर्सचे पासवर्ड प्लेन टेक्स्टच्या स्वरूपात साठवून ठेवले आहेत. ते कंपनीमध्ये काम करणारा एखादा कर्मचारी सहजपणे बाहेर काढू शकतो. त्यामुळे पासवर्डच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान अशा पद्धतीने युजर्सचे पासवर्ड लीक होणे शक्य नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकचे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. एखाद्या युजरने आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर कंपनीच्या टीमकडून तत्काळ डिलीट केली जाते.
Facebook वर आता आवडीच्या गाण्यासोबत पोस्ट करता येणार
गाणी ऐकायला अनेकांना आवडतं. काही वेळा आवडीची गाणी सोशल मीडियावर शेअर करून पोस्ट करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक वेळी हे शक्य होतं असं नाही. फेसबुक लवकरच आपल्या युजर्सना अशा पद्धतीची सुविधा देणार आहे. फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. या सुविधेसाठी फेसबुकने काही भारतीय संगीत कंपनीशी करार केला आहे. कंपनीने टी-सीरीज म्यूझिक, झी म्यूझिक आणि यश राज फिल्म्ससह काही कंपनींसह करार केला आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट आणि व्हिडीओसोबत गाणं शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे.
गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab
फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत. Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. रिपोर्टनुसार, युजर्सना या टॅबमध्ये टॉप स्टीमर्स आणि गेम पब्लिशर्सचे व्हिडीओ तसेच इतर गेमिंग गुप्सबाबत अपडेट दिसणार आहेत. सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक वेगळा गेमिंग टॅब लाँच केलं आहे. जगभरात जवळरपास 700 मिलियन म्हणजेच 70 कोटी युजर्स रोज व्हिडीओ गेम खेळतात असा दावा कंपनीने केला आहे.
फेसबुकवरून व्हॉट्सअॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...
गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फीचर आणत असतं. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरंतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत.