नवी दिल्ली - सोशल मीडिया हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. Facebook, WhatsApp अन् Instagram चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र बुधवारी (3 जुलै) व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरात डाऊन झालं होतं. तब्बल 9 तासांनंतर सोशल मीडिया पूर्ववत झाल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियाचं डाऊनलोड बंद झाल्याने युजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत फेसबुकने आता युजर्सची माफी मागितली आहे. युजर्सना त्रास झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.
बुधवारी जगभरात कोट्यवधी लोकांना फोटो पाठवण्यासह डाऊनलोडसुद्धा करता येत नसल्याचा अनुभव आला. अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. 'व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रातील लोकांना फोटो, व्हिडीओ, फाईल्स पाठवताना आमच्या प्लॅटफॉर्मवर अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यानंतर आता ही समस्या सोडवण्यात आली आहे. युजर्सना यामुळे जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी आम्ही माफी मागतो.' अशा शब्दांत फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे.
व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचे अनेकांनी बुधवारी ट्विटरवरून सांगितलं होते. Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडचणी येत असल्याचा तक्रारी केल्या होत्या. तसेच भारतातले युजर्सही प्रभावित झाले होते. युरोप, दक्षिण अमेरिका, जपानसारख्या देशांत देखील Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडथळे आले होते. मलेशिया, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्येही युजर्सना फेसबुक आणि WhatsApp वापरण्यात अडथळे येत होते.
WhatsApp चॅटींगची गंमत वाढणार, लवकरच 'हे' धमाकेदार फीचर्स येणार
1 जुलैपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. 1 जुलैपासून काही स्मार्टफोनवरील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड एफएक्यूनुसार, इंस्टंट मेसेजिंग अॅप फेब्रुवारी 2020 नंतर Android आणि iPhone मध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. ब्लॉगमध्ये अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. 1 जुलै 2019 पासून Windows Store मधून व्हॉट्सअॅप हटवले जाणार आहे. स्टॅटकाऊंटरच्या रिपोर्टनुसार जगभरात फक्त 0.24 टक्के लोक विंडो ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत आहेत. तसेच 31 डिसेंबर 2019 नंतर विंडोज फोनमधून व्हॉट्सअॅप बंद केलं जाणार आहे.
Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणार
Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं
सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणत असतं. अनेक जण फेसबुकच्यामाध्यमातून संवाद साधत असतात. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. मात्र यासाठी युजर्सना एक अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. फेसबुकने एक नवं रिसर्च अॅप आणलं आहे. 'स्टडी' असं या रिसर्च अॅपचं नाव असून फेसबुकने मंगळवारी (12 जून) याबाबत घोषणा केली. हे अॅप युजरचा फोन ट्रॅक करणार आहे. अॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अॅपला द्यावी लागणार आहे.