अमेरिकेतील फेसबुक युजर्स आता फेसबुक अॅपमधूनच व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल करत आहेत. फेसबुकने या फीचरची चाचणी सुरु केली आहे. या फीचरमुळे फेसबुक युजर्सना वारंवार मुख्य अॅपवरून मेसेंजर अॅपवर जावे लागणार नाही. सध्या हे फिचर अमेरिकेत उपलब्ध आहे, परंतु लवकरच हे जभरातील युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकते.
याआधी मेसेंजर आणि फेसबुक एकाच अॅपमध्ये उपलब्ध होते. परंतु, 2014 फेसबुकने मेसेंजरचे फिचर नव्या अॅपमध्ये टाकून दोन अॅप सादर केले होते. नव्या अॅपमध्ये मेसेज, व्हिडीओ कॉल आणि व्हॉइस कॉल असे फंक्शन्स देण्यात आले होते. फेसबुकने मेसेंजरचे काही मर्यादित फीचर्स फेसबुक अॅपमध्ये जोडण्यास सुरुवात केली आहे. कालांतराने हे फीचर्स वाढवले देखील जाऊ शकतात, त्यामुळे मेसेंजर अॅपचा वापर कमी होईल.
फेसबुकने सादर केलेले Horizon Workroom आहे तरी काय?
फेसबुक Oculus च्या मदतीने हे नवीन प्लॅटफॉर्म डेवलप करत आहे आणि घरातून काम होणाऱ्या कमला स्टॅंडर्ड स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. संवाद साधण्याची ही नवीन पद्धत लवकरच ‘Metaverse’ नावाने भविष्यातील ऑफिस स्पेस बनू शकते. Horizon Workroom अॅपचा उपयोग करण्यासाठी युजर्सना आपल्या अवतार व्हर्जनमध्ये मीटिंग होस्ट करावी लागेल. यासाठी Oculus Quest 2 हेडसेटचा वापर करावा लागेल. फेसबुकने Oculusच्या माध्यमातून वर्चुअल रियलिटी सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे.
हे नवीन अॅप मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. परंतु या अॅपचा वापर करण्यातही हार्डवेयर Oculus Quest 2 हेडसेट विकत घ्यावा लागेल, ज्याची किंमत $300 (जवळपास 22,000 रुपये) आहे. या नवीन प्लॅटफॉर्म VR मध्ये 16 आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये 50 लोक एकसाथ सामील होऊ शकतात. फेसबुकचे कर्मचारी या नवीन अॅपचा वापर करतात, असे कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या या उपक्रमामुळे घरातून काम करणाऱ्या लोकांना एक वर्चुअल ऑफिस मिळेल.