Facebook ने Ray-Ban ने एकत्र येऊन पहिले स्मार्ट ग्लासेस Ray-Ban Stories लाँच केले आहेत. Facebook ने एका ब्लॉग पोस्टमधून Ray-Ban Stories Smart Glasses च्या लाँचची माहिती दिली आहे. हे ग्लासेस फोटो काढणे आणि व्हिडीओ बनवणे, कॉल करणे आणि म्यूजिक ऐकण्यास मदत करतात. हे ऑगमेंटड रियालिटी ग्लासेस नाहीत किंवा या ग्लासेसच्या काचेवर काही डिस्प्ले देखील मिळत नाही. हे सामान्य सनग्लासेस आहेत ज्यांच्यासोबत कॅमेरा, माईक आणि स्पीकर मिळतो.
Ray-Ban Stories Smart Glasses ची किंमत
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार Ray-Ban Stories ची किंमत $299 (जवळपास 22,000 रुपये) पासून सुरु होईल. सध्या हे स्मार्ट ग्लासेस फक्त ऑनलाइन खरेदी करता येतील. तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली आणि यूकेमध्ये काही रिटेल स्टोरवर देखील हे ग्लासेस उपलब्ध होतील.
Ray-Ban Stories Smart Glasses चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी या ग्लासेसमध्ये ड्युअल इंटिग्रेटेड 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. यातून फक्त 30 सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. जेव्हा कॅमेरा वापरला जातो तेव्हा या चष्म्यावरील एलईडी लाईट ऑन होते. चाषम्यवरील बटन वापरून किंवा व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने हे फीचर्स वापरता येतात. ग्लासेसवर कॉल रिसिव्ह करण्यासाठी तीन मायक्रोफोन देण्यात आले आहेत. यातून रॉर्ड केलेले फोटो आणि व्हिडीओ एका अॅपमधून अॅक्सेस करता येतात. तसेच हे ग्लासेस बॅकग्राऊंड नॉइज सप्रेशनचा वापर करून कॉलिंग आणि म्युजिक एक्सपीरियन्स देतात.