नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप (Whatsapp) हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप सध्या आपल्या नव्या पॉलिसीमुळे चर्चेत आलं होतं. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होण्यासाठी सातत्याने नवनवीन भन्नाट फीचर आणत असतं. मात्र व्हॉट्सअॅपच्या युजर्सना आत एक मोठा झटका बसला आहे. व्हॉट्सअॅपवरील तुमचे खासगी मेसेज सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
कंपनीने अनेकदा स्पष्ट केले आहे की, खासगी मेसेज पूर्णपणे सुरक्षित असतात व कंपनी देखील वाचत नाही. मात्र एका नवीन रिपोर्टमध्ये याउलट दावा करण्यात आला आहे. Propublica कडून आलेल्या एका रिपोर्टनुसार, फेसबुक (Facebook) व्हॉट्सअॅपवरील खासगी मेसेज वाचू शकतं व शेअर देखील करू शकतं. या रिपोर्टविषयी सविस्तर जाणून घेऊया. व्हॉट्सअॅपने हजारपेक्षा अधिक लोकांना कॉन्ट्रॅक्टवर ठेवले आहे, जे ऑस्टिन, टेक्सास, डबलिन आणि सिंगापूरच्या ऑफिसमध्ये असतात. तेथून कर्मचारी लाखो यूजर्सचे कंन्टेंट तपासतात.
कर्मचारी फेसबुकच्या सॉफ्टवेअरचा वापर करून युजर्सचे खासगी मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतात. यासाठी कंपनी त्यांना पगार देते असं म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपवर साइन अप केल्यानंतर कंपनी त्यांना मेसेज पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करते. कंपनीचा दावा आहे की, मेसेज पूर्णपणे सुरक्षित असून, कंपनी देखील पाहू शकत नाही. मात्र, रिपोर्टमध्ये कंपनीचा हा दावा फेटाळण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅपचे डायरेक्ट ऑफ कम्यूनिकेशन्स कार्ल वूग यांनी मान्य केले की, ऑस्टिन व अन्य ठिकाणी टीम चुकीचे व्यवहार करणाऱ्यांची ओळख पटवणे व त्यांना हटवण्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेजला रिव्ह्यू करते. मात्र केवळ अशा कंन्टेंटला रिव्ह्यू केले जाते, जे धोकादायक आहे. यामध्ये फसवणूक, चाइल्ड पोर्न आणि दहशतवादी कृत्य अशा गोष्टींचा समावेश आहे असा दावा केला आहे. व्हॉट्सअॅपचे मेसेज एन्क्रिप्टेड असतात, त्यामुळे त्यांना वाचण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टमची मदत घेतली जाते. असे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर देखील शक्य आहे. एखाद्या युजरने कंन्टेंटच्याबाबतीत रिपोर्ट केल्यास असे मेसेज पाहिले जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....