फेसबुक(Facebook) नं अवघ्या जगाला एकत्र आणलं आहे. कोट्यवधी युजर्सचा फेसबुकचा वापर करतात. अनेकजण सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात एक्टिव्ह असतात. आता फेसबुकनं त्यांच्या पॉलिसीत बदल केला आहे. त्यामुळे आता फेसबुक वापरताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. फेसबुकनं आतापर्यंत ज्या कन्टेंन्टमध्ये सेक्सुअल व्हिजुवल्स आहेत अशा पोस्ट हटवल्या आहेत.
त्याचसोबत Facebook नं अनेक पब्लिक फिगरसारखे सेलिब्रेटी, पॉलिटिशियन, क्रिकेटर आणि पत्रकारांना टार्गेट करणाऱ्या अकाऊंटविरोधात कठोर पाऊल उचलण्याचं जाहीर केले आहे. यात यूजरचं प्रोफाइल, पेज, अथवा ग्रुप कायमचा बॅन होण्याची शक्यता आहे. अनेकदा पाहायला मिळतं की, सोशल मीडियात युजर्स बॉलिवूड, क्रिकेटर अन् राजकीय नेत्यांचे मीम्स बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. आता अशाप्रकारे खिल्ली उडवणं महागात पडू शकतं.
कंपनीने नवीन पॉलिसी अपडेट केली
फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी हेड एंटिगोन डेविस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये एखाद्याची प्रतिमा मलिन करणं आणि ऑनलाईन त्याला छळ देणाऱ्या लोकांवर कठोर बंधनं आणणार असल्याचं म्हटलं आहे. यासाठी कंपनीने फेसबुक पॉलिसीत बदल केला आहे. पब्लिक फिगर आणि खासगी व्यक्ती यांच्यातील चर्चांवर लक्ष ठेवले जाईल. ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जाणार आहे.
थेट मेसेज पाठवण्याच्या नियमातही बदल
कंपनी सार्वजनिकरित्या टार्गेट करणाऱ्या पोस्ट हटवणार आहे. त्याचसोबत सेक्सुअल कन्टेन्ट हटवण्याचं कामही सुरु आहे. कंपनी इनबॉक्समध्ये थेट मेसेज पाठवण्याच्या नियमात बदल करेल. प्रोफाईल आणि पोस्टवर कमेंट सुरक्षित ठेवेल. फेसबुक सेलिब्रेटी आणि प्रसिद्ध लोकांची यादी बनवेल. ज्यांना ऑनलाईन माध्यमातून छळण्याचे प्रकार कमी केले जातील.
फेसबुकची ही पॉलिसी फ्रांसेस हौगेन यांच्या खुलाशानंतर झाली आहे. ज्यात टाइम मॅगजीनेही ते पब्लिश केले होते. ज्यात फेसबुकने सोशल मीडियावर चुकीच्या आणि द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट विरोधात काम करणाऱ्या टीमच्या सर्व सदस्यांना बदललं आहे. फेसबुकने डिसेंबर २०२० मध्ये या टीमला हटवलं होतं. कंपनीने इन्स्टा आणि फेसबुकचा युवकांवर कसा नकारात्मक परिणाम होतोय याचा इंटरनेट सर्व्हेही लपवला होता.
Facebook नं १२५९ अकाऊंटवर बंदी घातली
फेसबुकने १२५९ अकाऊंट पेज आणि ग्रुपवर बंदी घातली आहे. फेसबुकने इराणमधील ९३ अकाऊंट, १४ पेज आणि १५ ग्रुप आणि १९४ इन्स्टाग्राम हटवले. याच महिन्यात फेसबुकने सूडान आणि इराण येथील दोन नेटवर्क हटवले. सूडानमध्ये फेसबुकनं ११६ पेज, ६६६ फेसबुक अकाऊंट आणि ६९ ग्रुप, ९२ Instagram अकाऊंट हटवले आहेत