Facebook Instagram Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभर ठप्प झाले आहे. युजर्सचे अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणींमुळे युजर्स चिंतेत असल्याचे दिसत आहे. मेटा प्लॅटफॉर्मच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामने अचानक काम करणे बंद केले आहे. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांनी ट्विटरवरून आणि इतर प्लॅटफॉर्मवरून याबद्दल तक्रार केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी रात्री (५ मार्च २०२४) अचानक डाउन झाले. युजर्सचे सोशल मीडिया अकाउंट अचानक लॉग आउट झाल्याच्या घटना घडल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभर ठप्प झाले. लॉग आऊट झाल्यानंतर युजर्सना लॉग इन करताच येत नसल्याचे दिसून आले. भारतीय वेळेनुसार अंदाजे रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी ठप्प झाले.
फेसबूक डाऊन
इन्स्टाग्राम डाऊन
फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #facebookdown ट्रेंडिंग सुरू झाले. युजर्स त्यांच्या तक्रारींसोबतच मजेशीर प्रतिक्रियाही देताना दिसले.
--
--