नवी दिल्ली - फेसबुक हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने भारतात आपले म्युझिक प्रोडक्ट्स लॉन्च केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, म्युझिक प्रोडक्ट्सच्या मदतीने युजर्स गाण्याच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करू शकतात. तसेच फेसबुक प्रोफाईल आणि स्टोरीमध्येही यामुळे आवडतं गाणं ऐकवता येणार आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये म्युझिक स्टिकर, लिरिक्स, लिप सिंक लाईव्ह सारख्या सुविधा देण्यात येणार आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रोडक्ट्सच्या मदतीने युजर्स बॉलिवूडची लोकप्रिय गाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वापरू शकतात. फेसबुकचं हे प्रोडक्ट 55 देशांमध्ये उपलब्ध आहे. फेसबुक इंडियाचे डायरेक्टर आणि पार्टनरशिप हेड मनीष यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना प्लॅटफॉर्मवर गाण्यांच्या माध्यमातून अनेकांशी कनेक्ट होता येईल तसेच आपल्या भावना व्यक्त करता येतील हा कंपनीचा यामागे उद्देश आहे.
म्युझिक इकोसिस्टम मजबूत आहे. नव्या प्रोडक्ट्ससाठी भारतीय म्युझिक कम्युनिटीसोबत पार्टनरशिप करण्यात आली आहे. गाण्यांच्या माध्यमातून युजर्स आता आपल्या भावना व्यक्त करतील याचा कंपनीला आनंद असल्याची माहिती मनीष यांनी दिली आहे. फेसबुकने युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी हे फीचर आणलं आहे. फेसबुक आणखी एक नव्या मेसेजिंग अॅपवर सध्या काम करत आहे. यामुळे युजर्सना आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत अधिक गोष्टी शेअर करता येणार आहेत. 'थ्रेड' असं या अॅपचं नाव असून फेसबुक इन्स्टाग्रामसाठी हे नवं मेसेजिंग अॅप आणण्याच्या तयारीत आहे.
इन्स्टाग्रामवरील युजर्स थ्रेड अॅपच्या मदतीने क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या लोकांसोबत लोकेशन, स्पीड आणि बॅटरी लाईफ शेअर करण्यासाठी इन्वाइट करता येणारआहे. तसेच इन्स्टाग्रामच्या क्रिएटिव्ह टूल्सच्या मदतीने ऑटोमॅटीकली टेक्स्ट, फोटो आणि व्हिडीओ मेसेजसारख्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करता येणार आहेत. फेसबुकने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चॅटिंगची गंमत वाढवणारं फेसबुकचं 'हे' फीचर माहीत आहे का?फेसबुकवर अनेक फीचर आहेत मात्र फारच कमी युजर्सना याची माहिती आहे. फेसबुकवर फ्रेंड्स लिस्ट नावाचं एक फीचर असून या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट तयार करू शकतात. फेसबुकवर वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय मिळते असल्याने हे फीचर युजर्ससाठी फायदेशीर आहे. युजर्सना त्यांच्या आवडीची फ्रेंड लिस्ट तयार करता येणार असल्याने चॅटिंगची गंमत वाढवणार आहे. नव्या फिचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील.