नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या मीम्सने धुमाकूळ घातला आहे. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण फेसबुकने मीम्स तयार करणारं एक अॅप लाँच केलं आहे. Whale असं या अॅपचा नाव असून सोशल मीडिया कंपनी फेसबुक आणि न्यू प्रॉडक्ट एक्सपेरिंमेंटेशन (एनपीई) टीमने एक नवीन अॅप लाँच केलं आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. या अॅपच्या मदतीने युजर्स स्टॉक लायब्ररीमधून फोटो अॅड करून मीम्स तयार करू शकतात. तसेच सोशल मीडिया किंवा मेसेज थ्रेडवर शेअर करण्याआधी अनेक इफेक्ट्स देता येणार आहे.
Whale अॅपच्या मदतीने तयार केलेले मीम्स फोनमध्ये सेव्ह करता येणार आहेत. यूएसचं अॅप स्टोर इंटेलिजेंस फर्म Apptopia ने सर्वप्रथम फेसबुकचं हे नवं अॅप स्पॉट केलं. यामध्ये फॉन्ट्स, फोटोज, इमोजी, फिल्टर्स, इफेक्ट्स आणि टूल्स युजर्सना देण्यात आले आहेत. या सोबतच एक फ्री-फॉर्म ड्रॉईंग टूल पण या अॅपचा भाग आहे. यामध्ये फोटो कस्टमाईज करून त्यापासून मीम्स तयार करता येणार आहेत. तसेच स्टीकर तयार करण्यासाठी फोटो क्रॉप किंवा कट करता येणार आहेत.
लेजर आइज, बल्ज आणि वोर्टेक्स सारखे लोकप्रिय सोशल मीडिया इफेक्ट्स देखील Whale मध्ये युजर्सना देण्यात आले आहेत. युजर्सच्या गरजेनुसार एनपीई टीम अॅप विकसित करणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. फेसबुक सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. असंच एक भन्नाट फीचर फेसबुकने आपल्या युजर्सने आणलं आहे. या फीचरच्या मदतीने फेसबुक आता आपल्या युजरला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखणार आहे. म्हणजेच युजर्सना लवकरच चेहऱ्याने अकाऊंट व्हेरिफाय करता येणार आहे.
फेसबुकच्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहीत आहेत का?
मस्तच! न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार फेसबुक
अॅप रिवर्स इंजिनिअर जेन मॉनचन वॉग्नने दिेलेल्या एका रिपोर्टनुसार, युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी ही आणखी मजबूत करण्यासाठी फेसबुक फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप करण्याची तयारी करत आहे. फेसबुकवर अनेक दिवसांपासून फेक अकाऊंट हटवण्यासाठी मोहीम सुरू आहे. अनेकदा काही लोक इतर व्यक्तींच्या नावाने फेक अकाऊंट तयार करतात. तसेच त्यांच्या अकाऊंटवरून चुकीच्या गोष्टी पोस्ट करतात. आतापर्यंत फेसबुक अशा समस्या या अल्गोरिदम फिल्टरिंग आणि मॅन्युअल पद्धतीने सोडवत होते. मात्र तरीही फेक प्रोफाईलच्या समस्येचा सामना हा करावा लागत आहे. फेसबुकवर सर्वात जास्त फेक अकाऊंट हे लोकप्रिय व्यक्ती आणि सेलिब्रिटीजचे असतात. मोबाईल अॅपसाठी खास हे फीचर तयार केले जात आहे.
फेक अकाऊंटच्या समस्येचा सामना करण्यासाठी फेसबुकने मोबाईल अॅपसाठी फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप करत आहे. या सिस्टमच्या मदतीने युजर्सचा चेहरा स्कॅन केला जाईल त्यानंतर ते अकाऊंट स्वत: चं आहे की नाही याबाबत माहिती मिळेल. फेसबुक फीचरवर रिसर्च करणाऱ्या वॉन्गने या फीचरची माहिती दिली आहे. फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने एक नवीन लोगो लाँच केला आहे. एका खास उद्देशाने कंपनीने हा नवा लोगो लाँच केला आहे. फेसबुकच्या या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्लिश अक्षरं ही कॅपिटलमध्ये दिसणार आहेत.