मुंबई : तसं तर माणसांचं डोकं जवळपास सगळंच लक्षात ठेवतं आणि यात जुन्या आठवणींचाही समावेश असतो. पण अनेकदा असं होतं की, काही जुन्या आठवणी आणि त्यासंबंधी माहिती आठवतही नाही. पण फेसबुसने तुमच्या या समस्येचं निराकरण केलं आहे. फेसबुकने एक 'Memories' पेज फीचर लॉन्च केलंय. तुमच्याकडून फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या सर्वच आठवणी फेसबुक या पेजवर दाखवणार आहे.
फेसबुकचं हे नवं फीचर जुन्या 'On the Day' या फीचरचा नवा अवतार आहे. या माध्यामातून तुम्ही गेल्यावर्षी आजच्या दिवशी शेअर केलेल्या आठवणी मेमरीच्या रुपात पुन्हा बघू शकता.
Memories www.facebook.com/memories सेक्शनमध्ये जुने ऑन दिस डे या कन्टेंटसोबतच आणखीही काही गोष्टी दिसणार आहेत. यात तुम्ही आजच्या दिवशी कोणत्या व्यक्तीला मित्र बनवलं होतं. त्यासंबंधी स्पेशल व्हिडीओ आणि कोलाज राहतील. त्यासोबतच आणखीही काही छोटे व्हिडीओ असतील जे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या करतील.
यासोबतच फेसबुक यूजर्सकडे आपल्या न्यूज फीडमधून स्टोरीज डिसमिस करण्याचाही पर्याय असेल. त्यांना हवं असेल तर ते मेमरीज पेजच्या प्रेफरेंस सेक्शनमध्ये जाऊन फीचर ब्लॉक किंवा काही निवडक लोकांना ब्लॉक करु शकतात.