सोशल मीडियात अग्रेसर असणारी कंपनी फेसबुकने आपल्या लाइट व्हर्जनच्या अँड्राईड युजर्ससाठी डार्क मोड लाँच केले आहे. याशिवाय, फेसबुक लवकरच हे फीचरला आयओएस युजर्ससाठी घेऊन येणार आहे.
डार्क मोड संबंधित माहिती टेक्नॉलॉजी साइट अँड्राईड पोलीसच्या अहवालातून मिळाली आहे. दरम्यान, आतापर्यंत मुख्य फेसबुक अॅपला डार्क मोडचा सपोर्ट देण्यात आला नाही. तर दुसरीकडे याआधी व्हॉट्सअॅपने अँड्राईड बीटा व्हर्जनसाठी डार्क मोड जारी केले होते.
डार्क मोडचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात आधी फेसबुक लाइटचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे. डाऊनलोडिंग पूर्ण झाल्यानंतर लॉन-इन करून सेटिंगमध्ये जाऊन डार्क मोडचा ऑप्शन ऑन करावा लागेल.
यानंतर फेसबुक लाइटचे इंटरफेस पूर्णपणे ब्लॅक दिसेल. अशाच याप्रकारे युजर्स या नवीन फीचरला ऑफ सुद्धा करू शकतात. दरम्यान, फेसबुक कंपनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व युजर्संसाठी हे फीचर उपलब्ध करू करेल. दरम्यान, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात.
फेसबुकवरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्रीफेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. वेगवेगळ्या साईटशी संबंधित अनेक जाहिराती या फेसबुकवर दाखवल्या जातात. त्या ऑफ करता येतात. फेसबुकवर नको असलेल्या जाहिराती ऑफ करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने ब्राऊजिंग डेटा देखील क्लिअर करता येतो. फेसबुकने Clear History Tool युजर्सला दिले आहे ज्याच्या मदतीने सोशल नेटवर्किंग साईटवर ब्राऊजिंग डेटा डिलीट करता येणार आहे.
फेसबुकवरून ब्राऊजिंग हिस्ट्री डिलीट करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील त्याबाबत जाणून घेऊया.- फेसबुकवर सेटिंग्स आणि प्रायव्हसी मेन्यूमध्ये जा. या मेन्यूमध्ये देण्यात आलेल्या सेटिंग्सवर क्लिक करा. - स्क्रोल केल्यानंतर ऑफ फेसबुक अॅक्टिव्हिटी ऑप्शनवर दिसेल.- पेजवर ऑफ फेसबुक अॅक्टिव्हिटी काय आहे आणि ते कसं मॅनेज करायचं यासाठी ऑप्शन देण्यात आला आहे. - ऑफ फेसबुक ऑक्टिव्हिटी मॅनेज करण्यासाठी आणि सेटींगमध्ये बदल केल्यास तुमच्याकडे पासवर्ड मागितला जाईल. - पासवर्ड टाकल्यानंतर ज्या साईटसोबत तुमचा डेटा शेअर झाला आहे. तसेच ज्यांची ब्राऊजिंग हिस्ट्री फेसबुकवर सेव्ह केलेली आहे त्याची एक लिस्ट दिसेल. - क्लिअर हिस्ट्रीचा एक ऑप्शन मिळेल. असं केल्यास त्या साईटवरून लॉग आऊट करता येईल. फेसबुकच्या मदतीने लॉग इन असलेल्या साईटवरून लॉग आऊट व्हाल. - या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर क्लिअर हिस्ट्री ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमचा डेटा क्लिअर करा.
'या' बातम्या ही नक्की वाचा
कोरोना व्हायरसची धास्ती, जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट रद्द!
Google Maps ला एका कलाकाराने हॅक केले; कोंडी दिसल्याने वाहतूकच वळली
स्मार्टफोनची बॅटरी लवकर कमी होते?, 'या' ट्रिक्स करतील मदत
WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या