Facebook च्या गेल्यावर्षी पॅरेंट कंपनी Meta वर अमेरिकन एजेंसी FTC मोनोपॉली करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कंपनीनं Instagram आणि WhatsApp या कंपन्या विकल्या पाहिजेत. यासाठी FTC नं फेसबुकवर खटला देखील दाखल केला आहे आणि तो खटला रद्द करण्याचा मेटा पहिला प्रयत्न फसला आहे.
मेटा (जुनं नाव ‘फेसबुक’) वर गेले कित्येक दिवस से अँटीट्रस्टचा आरोप ठेवण्यात आला आहे. यात छोट्या कंपन्यांना बाजारात टिकून न देण्याचा आणि अमेरिकेतील सोशल मीडिया स्पेसवर कब्जा करण्याचा आरोप आहे. यासाठी कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना देखील विकत घेत आहे. यासाठी अनेकदा मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांची अमेरिकन संसदेत चौकशी देखील करण्यात आली आहे.
अँटी ट्रस्ट प्रकरणात अमेरिकन एजेंसी FTC (फेडरल ट्रेड कमिशन) यश मिळालं आणि FTC नं मेटाला कोर्टात खेचलं. Meta नं आपले दोन लोकप्रिय अॅप्स विकावे अशी FTC ची मागणी आहे, जी ग्राहकांचे हिताचे रक्षण करणार अमेरिकन सरकारची स्वतंत्र एजेंसी आहे.
एफटीसीने दाखल केलेला खटल्याविरोधात मेटाने देखील अपील केली होती. परंतु एजेंसी असा खटला दाखल करू शकते तो यशस्वी होईल कि नाही हे कोर्टाची कारवाई पूर्ण झाल्यावर समजेल, असं म्हणत कोर्टाने मेटाची अपील रद्द केली आहे. या खटल्याचा निकाल एफटीसीच्या बाजूने लागल्यास मेटाला व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकावं लागू शकतात. परंतु मेटा हा खटला जिंकेल असा कंपनीला विश्वास आहे, असं एका विधानात कंपनीनं म्हटलं आहे.
हे देखील वाचा:
हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket
LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक; सहज करता येणार तक्रार