फेसबुकने आपल्या मॅसेंजर प्लॅटफॉर्मवर चॅट आणि कॉलसाठी व्हाईस कमांड फिचरचे टेस्टिंग सुरु केले आहे. यानुसार लवकरच युजर्स व्हाईस कमांड देऊन मॅसेज टाईप करणे आणि पाठवू शकणार आहेत. तसेच व्हाईस कॉल आणि रिमायंडर सेट करू शकणार आहेत.
फेसबुकच्या प्रवक्त्याने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांपुरतेच हे फिचर मर्यादित ठेवले असून त्याची चाचणी सुरु आहे. व्हाईस कंट्रोल फिचरमुळे अनेक गोष्टी सहज शक्य होणार आहेत. यापूर्वी फेसबुक मॅसेंजरला स्पीच ट्रान्सक्रिप्शनची टेस्टिंग करताना पाहिले गेले होते.
जगभरात एकूण 130 कोटी लोक फेसबुकच्या मॅसेंजरचा वापर करतात. या प्लॅटफॉर्मला एसएमएस, स्नॅपचॅट, अँड्रॉईड मॅसेज आणि अन्य टेक्ट मॅसेजच्या प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे ठेवण्याचा प्रयत्न फेसबुक करत आहे.
या सारखेच अॅप गुगलनेही विकसित केले आहे. याला Voice Access असे म्हणतात.