नवी दिल्ली - फेसबुक हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर करत असतात. मात्र आतापर्यंत मर्यादीत संख्येतच मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणं शक्य आहे. फेसबुक नेहमीच युजर्ससाठी नवीनवीन फिचर्स आणतं असतं. फेसबुक वापरणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण फेसबुकच्या ग्रुप चॅटमध्ये एकाच वेळी 250 जणांना अॅड करणं आता शक्य होणार आहे.
फेसबुकच्या या नव्या फिचरमुळे एकाच वेळी 250 जणांसोबत आता संवाद साधता येणार आहे. टेकक्रंचने याबाबतचे एक वृत्त दिले आहे. फेसबुकवर ग्रुप चॅट कोणी सुरू केल्यानंतर तुम्हाला त्याचं निमंत्रण देणार एक नोटीफिकेशन येईल. तुमची परवानगी असेल किंवा तुम्हाला चॅट करायची इच्छा असल्यास तुम्ही ते निमंत्रण स्विकारू शकता. त्यानंतर तुम्ही ग्रुप चॅटमध्ये सहभागी व्हाल. यामध्ये ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. यामध्ये एकाच वेळी 50 जण सहभागी होऊ शकतात.
मेसेज रिअॅक्शनचं नोटीफिकेशन, नोटीफिकेशन ऑन ऑफ, चॅट दरम्यान मेन्शन करणाऱ्या सर्व गोष्टी ग्रुप चॅटमध्ये असणार आहे. मात्र किती जणांचा ग्रुप असावा आणि ग्रुप कधी बंद करावा हे अधिकार ग्रुप अॅडमिनकडे असणार आहेत. फेसबुकच्या ग्रुपमध्ये याआधी केवळ 150 जणांना अॅड करणं शक्य होतं.