शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Facebook वर नवं फीचर येणार, चित्रपटाच्या शो-टाईमचं नोटिफिकेशन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:39 PM

फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकवर आता चित्रपटांचं शो टाईमही पाहता येणार आहेत.

ठळक मुद्दे फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकवर आता चित्रपटांचं शो टाईमही पाहता येणार आहेत. मूव्ही रिमाइंडर अ‍ॅड्स आणि मूव्ही शो-टाईम अ‍ॅड्स हे दोन फीचर लवकरच लाँच करण्यात येणार.एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो चित्रपट पाहण्याचं रिमाइंडर देणारं नोटिफिकेशन लवकरच युजर्सना मिळणार.

नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकवर आता चित्रपटांचं शो टाईमही पाहता येणार आहेत. त्यासोबतच तिकीटं ही बूक करता येणार आहे. मूव्ही रिमाइंडर अ‍ॅड्स आणि मूव्ही शो-टाईम अ‍ॅड्स हे दोन फीचर लवकरच लाँच करण्यात येणार आहेत. अनेकदा युजर्सना एखादा चित्रपट पाहायचा असतो. मात्र तो कधी प्रदर्शित झाला किंवा होणार याची तारीख ते विसरून जातात. अशा युजर्सना फेसबुकच्या या नव्या फीचर्सचा फायदा होणार आहे. 

एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो चित्रपट पाहण्याचं रिमाइंडर देणारं नोटिफिकेशन लवकरच युजर्सना मिळणार आहे. मूव्ही रिमाइंडर अ‍ॅड्स हे फीचर एखादा चित्रपट कधी प्रदर्शित होणार किंवा झाला आहे याची युजर्सना आठवण करून देणार आहे. फेसबुकवर चित्रपटाची अ‍ॅड दाखवली जात असताना युजर्सना 'Interested' बटणावर क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याचं नोटिफीकेशन पाठवण्यात येईल. 

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, रिमांडर सेट करणाऱ्या युजर्सना चित्रपट प्रदर्शित झाल्याचं एक नोटिफिकेशन मिळेल. त्या नोटिफिकेशनवर टॅप केल्यानंतर युजर्सना मूव्ही डीटेल्स पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. एखाद्या चित्रपटाच्या जाहिरातीवर क्लिक करून गेट शो-टाईम निवडल्यावर सगळी माहिती समजणार आहे तसेच चित्रपटाचं तिकीटंही बूक करता येणार आहेत. तर दुसऱ्या फीचरच्या मदतीने मूव्ही शो-टाईन अ‍ॅड्स आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी असणार असून त्याबाबत माहिती देणार आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चॅटिंगची गंमत वाढवणारं फेसबुकचं 'हे' फीचर माहीत आहे का?फेसबुकवर अनेक फीचर आहेत मात्र फारच कमी युजर्सना याची माहिती आहे. फेसबुकवर फ्रेंड्स लिस्ट नावाचं एक फीचर असून या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट तयार करू शकतात. फेसबुकवर वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय मिळते असल्याने हे फीचर युजर्ससाठी फायदेशीर आहे. युजर्सना त्यांच्या आवडीची फ्रेंड लिस्ट तयार करता येणार असल्याने चॅटिंगची गंमत वाढवणार आहे. नव्या फिचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील.   

Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसंफेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. मात्र यासाठी युजर्सना एक अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. फेसबुकने एक नवं रिसर्च अ‍ॅप आणलं आहे. 'स्टडी' असं या रिसर्च अ‍ॅपचं नाव असून फेसबुकने मंगळवारी (12 जून) याबाबत घोषणा केली. हे अ‍ॅप युजरचा फोन ट्रॅक करणार आहे.  अ‍ॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अ‍ॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अ‍ॅपला द्यावी लागणार आहे. यानंतर हे अ‍ॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अ‍ॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करणार आहे. फोन ट्रॅक करण्याची परवानगी देणाऱ्या युजर्सना फेसबुक पैसे देणार आहे. मात्र संबंधित अ‍ॅप केवळ 18 वर्षांपेक्षा  जास्त वय असलेले युजर्सच डाऊनलोड करू शकतात.

 

टॅग्स :Facebookफेसबुकcinemaसिनेमाtechnologyतंत्रज्ञान