जगभरातील समाजमाध्यमप्रेमींच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या फेसबुकने गेल्याच महिन्यात स्वत:चे नाव बदलून मेटा असे केले. मात्र, नाव बदलले असले तरी फेसबुकच्या जुन्या सवयी अजूनही कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. वादग्रस्त ठरलेल्या अल्गोरिदमचा वापर करून मुलांचे ट्रॅकिंग करण्याचे फेसबुकचे काम सुरू आहे.
मुलांचे ट्रॅकिंग म्हणजे काय?
- नवीन नामकरण करताना फेसबुकने अल्गोरिदम बदलण्याचा वायदा केला होता.
- अल्गोरिदमच्या माध्यमातून मुलांचे, विशेषत: टीएनएजर्सचे ट्रॅकिंग केले जाते.
- टीएनएजर्स कोणत्या जाहिराती पाहतात, याचे विश्लेषण करून त्यानुसार फेसबुकवर जाहिरात दाखविल्या जायच्या.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापर करून फेसबुक हे ट्रॅकिंग करायचे.
- नाव बदलल्यानंतरही मुलांचे ट्रॅकिंग सुरू असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
टीएनएजर्सच्या वर्तनाचेही ट्रॅकिंग
- १८ वर्षांहून कमी वयाच्या मुलांचे ऑनलाइन वर्तन कसे आहे, यासाठीही फेसबुकने आपले तंत्र वापरले आहे.
- नफ्यात वाढ व्हावी यासाठी फेसबुककडून मुलांच्या या अभ्यासाचा वापर केला जात असल्याचा आरोप माजी कर्मचाऱ्याने केला होता.
- मुलांच्या ऑनलाइन वर्तनाचा अभ्यास करून त्यांचा डेटा स्टोअर केला जात असल्याचेही या माजी कर्मचाऱ्याने म्हटले होते.
- नाव बदलल्यानंतरही डेटा स्टोअर करण्याचे काम सुरू असल्याचे दिसले.
स्वयंसेवी संस्थांचे आवाहन-
- फेसबुकच्या अल्गोरिदम उपक्रमावर आक्षेप घेत
- स्वयंसेवी संस्थांनी हा उपक्रम थांबविण्याची मागणी करणारे पत्र फेसबुकला पाठवले आहे.
- मात्र, फेसबुकने मुलांच्या डेटाचे ट्रॅकिंग करत नसल्याचे उत्तर या स्वयंसेवी संस्थांना दिले आहे.
- टीएनएजर्सच्या ऑनलाइन वर्तनावर आर्टिफिशियल
- इंटेलिजन्सच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात नसल्याचेही फेसबुकने स्पष्ट केले आहे.