जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता स्मार्टवॉचही आणण्याच्या तयारीत आहे. युझर्सना या स्मार्टवॉचचा वापर मेसेज पाठवण्यासाठी, फिटनेस आणि हेल्थसाठी करू शकतात. The Information च्या रिपोर्टनुसार हे स्मार्टवॉच अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतं. तसंच या स्मार्टवॉचची विक्री पुढील वर्षापासून होऊ शकते. ज्या मार्केटवर Apple आणि हुवावे सारख्या कंपन्यांचं वर्चस्व आहे अशा मार्केटमध्ये आता फेसबुकही टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार हे स्मार्टवॉच सेल्युलर कनेक्शनद्वारे काम करेल. अन्य स्मार्टवॉचप्रमाणे यातही मेसेजिंग, हेल्थ ट्रॅकिंग, फिटनेस असे फिचर्स देण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच गुगलच्या Wear OS वर चालणार आहे का नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. फेसबुक हार्डवेअर डिव्हाईसेससाठी स्वत:चं ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यावर काम करत असल्याचंही म्हटलं जात आहे. गेल्या काही काळापासून फेसबुक आणि Apple या कंपन्यांमधील संबंध उत्तम नाहीत. अॅपलच्या नव्या प्रायव्हसी नियमांचा फेसबुककडून विरोध केला जात आहे. अॅप स्टोअरमध्ये जी कोणतीही अॅप्स आहेत ती युझर्सची कोणती वैयक्तीक माहिती जमा करू शकतात यासंदर्भात एक नियम तयार केला जाणार असल्याचं अॅपलनं यापूर्वी म्हटलं आहे. अॅपलच्या या निर्णयामुळे पर्सनलाईज्ड अॅड्स दाखवण्यात समस्या उद्भवू शकतात असा दावा फेसबुतं केला आहे. अॅपल वॉच जगात सर्वाधित विक्री होणाऱ्या स्मार्टवॉचपैकी आहे. यामध्ये युझर्सना SpO2 मेजरमेंट आणि फॉल डिटेक्शनसारखे अनेक हेल्थ फिचर्स यात देण्यात आले आहे. अशात अनेक प्रकरणांमध्ये अॅपल वॉचमुळे लोकांची जीवही वाचल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फॉल डिटेक्शन फीचर युझर अचानक पडल्यावर त्याच्या इमरजन्सी कॉन्टॅक्टला युझरचं लोकेशन पाठवतो.
Apple ला टक्कर देण्यासाठी Facebook ही स्मार्टवॉच लाँच करण्याच्या तयारीत, असे असतील फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 5:59 PM
Facebook Smartwatch : Apple आणि हुवावे सारख्या कंपन्यांच्या स्मार्टवॉचला फेसबुकचं स्मार्टवॉच टक्कर देणार
ठळक मुद्देApple आणि हुवावे सारख्या कंपन्यांच्या स्मार्टवॉचला फेसबुकचं स्मार्टवॉच टक्कर देणारपुढील वर्षी फेसबुकचं स्मार्टवॉच लाँच होण्याची शक्यता