सध्या सोशल मीडियावर ChatGPT ची जोरदार सुरू आहे, हे अॅप सर्वात मोठं असलेले सर्च इंजिन Google'ला टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच ChatGPT ची क्रेझ जास्त आहे. अनेकजण हे अॅप वापरण्यासाठी इन्स्टॉल करत आहेत. तुम्ही हे ChatGPT अॅप इन्स्टॉल केले आहे का? तुम्ही जर हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
MacRumors च्या अहवालानुसार, ChatGPT च्या नावावर पैसे कमवण्याचे काम सुरु आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर बनावट अॅप्स आले आहेत. यासोबतच या अॅप्समध्ये बनावट रिव्ह्यूही देण्यात आले आहेत.
हे बनावट ChatGPT अॅप Google Play Store आणि Apple Play Store वर सर्वात लोकप्रिय अॅप श्रेणीमध्ये आहे. वापरकर्त्यांनी या बनावट चॅटजीपीटी अॅप्सबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.
ओपनएआय व्हर्जनचे अधिकृत मोबाइल अॅप ChatGPT द्वारे मोफत उपलब्ध करून दिलेले नाही. अॅपलही हे बनावट अॅप शोधले आहे. Apple App Store वर Fake ChatGPT ChatGPT AI तसेच GPT-3 नावाची अॅप्स आहेत. या अॅप्सचे जवळपास 12,000 रिव्हू आले आहेत. Apple App Store वर या अॅप्सना 5 पैकी 4.6 रेट केले आहे. भारतात या बनावट अॅप्सचे 500 रिव्ह्यू आहेत.
सध्या हे बनावट चॅटजीपीटी अॅप पैसे कमवत आहे. हे अॅप्स काही प्रीमियम सेवेच्या नावाखाली जादा पैसे आकारले जात आहेत.
जर तुम्हाला कुठेतरी ChatGPT अॅप इन्स्टॉल करण्याचा पर्याय सापडला तर तुम्ही ते लगेच टाळावे. एआय आधारित चॅटबॉट ब्राउझरद्वारे फक्त त्याच्या अधिकृत वेबसाइट Chat.openai.com वर वापरला जाऊ शकतो, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे खाते उघडू शकता.