असुस कंपनीने आपला झेडफोन ५ झेड हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी लाँच केला असून यामध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. असुस कंपनीच्या झेडफोन ५ झेड या मॉडेलबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले होते. या अनुषंगाने हे मॉडेल आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. याला तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यातील ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असणार्या व्हेरियंटचे मूल्य २९,९९९ तर ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजयुक्त व्हेरियंटचे मूल्य ३२,९९९ रूपये असणार आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे मॉडेल हे ३६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.
हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून सादर करण्यात आला असून ९ जुलैपासून तो खरेदी करता येणार आहे. यासोबत कंपनीने काही आकर्षक ऑफर्स प्रदान केल्या आहेत. यात आयसीआयसीआयच्या कार्डवरून याला खरेदी करणार्या ग्राहकांना ३ हजार रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. यात ३,३३३ रूपयांपासून नो-कॉस्ट इएमआयची सुविधा ग्राहकांना देण्यात आलेली आहे. यासोबत फ्लिपकार्टने देऊ केलेले (४९९ रूपये मूल्य असणारे) कंप्लीट मोबाईल प्रोटेक्शन ग्राहकाला मिळणार आहे. तर रिलायन्सच्या जिओतर्फे यासोबत २२०० रूपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि १०० जीबी मोफत डाटा प्रदान करण्यात येणार आहे.
असुस झेडफोन ५ झेड या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा अतिशय गतीमान असा प्रोसेसर देण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार याला ६ आणि ८ जीबी रॅमसह तीन विविध स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. या तिन्हींमधील स्टोअरेज हे २ टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा युजरला मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर असुसचा झेनयुआय ५.० हा युजर इंटरफेस असणार आहे. यातील ऑपरेटींग सिस्टीम लवकरच अँड्रॉइड पी या आवृत्तीशी अपग्रेड करण्यात येणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. यातील ६.२ इंच आकारमानाचा डिस्प्ले हा १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२४६ बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आहे.
असुस झेडफोन ५ झेड मॉडेलच्या मागील बाजूस १२ आणि ८ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यातील पहिल्या कॅमेर्यात सोनी आयएमएक्स ३३३ सेन्सर दिलेले आहे. यामध्ये एलईडी फ्लॅश, एफ/१.८ प्रोसेसर, ८३ अंशातील व्ह्यू दिलेला आहे. तर दुसर्या कॅमेर्या एफ/२.२ अपर्चर, १२० अंशातील वाईड अँगल लेन्स दिलेली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये एफ/२.० अपर्चर, ८४ अंशाचा फिल्ड व्ह्यू युक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. यामध्ये असुस बुस्टमास्टर आणि एआय चार्जींग या सुविधांनी सज्ज असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.