Fine on Meta in Britain: गेल्या काही दिवसांपासून फेसबुकसमोरील (Facebook) समस्या वाढताना दिसत आहेत. प्रथम, अमेरिकेत एफटीसीने (FTC) त्यांच्यावर मक्तेदारी संदर्भात केस दाखल केली. त्यानंतर काही दिवसांपासून फेसबुकचे युझर्सही कमी झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आता पुन्हा एकदा फेसबुकला मोठा झटका बसला आहे. येथे मेटाला सुमारे १५ कोटी पौंड दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीच्या अडचणी इथेच संपल्या नसून ब्रिटनच्या स्पर्धा नियामकाने मेटाला (Meta) दंडासह त्यांचे एक प्लॅटफॉर्म विकण्याचे आदेश दिले आहेत.
रिपोर्टनुसार Meta ने मे 2020 मध्ये ४० कोटी डॉलर्स खर्च करून अॅनिमेटेड इमेज प्लॅटफॉर्म गिफी (Giphy) विकत घेतले. मेटाने या डीलचा त्याच्या डिजिटल जाहिरातींवर (Digital Advertising) काय परिणाम झाला हे सांगितलेले नाही. ही बाब गंभीर लक्षात घेऊन ब्रिटनच्या कॉम्पिटीशन अँड मार्केट्स अथॉरिटीने (CMA) मेटाला १५ कोटी पौंडांचा दंड ठोठावला आहे.
एवढेच नाही तर मेटा गिफीचे कामकाज चालवण्याच्या सर्व गरजा पूर्ण करत नसल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. अशा स्थितीत हे व्यासपीठ त्याला विकण्याचे आदेशही प्राधिकरणाने दिले आहेत. मेटा या कारवाईवर खूश नाही. हा योग्य निर्णय नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. परंतु कंपनीनं आपण दंडाची रक्कम भरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
यापूर्वीही दंडसीएमएने मेटा वर अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्राधिकरणाने यापूर्वीच मेटाला दंड ठोठावला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये, प्राधिकरणाने Facebook वर सुमारे ५.०५ कोटी पौडांचा दंड ठोठावला होता. गेल्या काही दिवसांपासून फेसबुकच्या अडचणी वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या आकडेवारीनुसार फेसबुकच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.