नवी दिल्ली: व्हॅाट्सअॅप कंपनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येते. त्यातच आता व्हॉट्सअॅप बीटामध्ये फिंगरप्रिंट लॉक हे फीचर्स वापरता येणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे.
या संबंधीत माहिती WABetaInfoने ट्विट करत दिली आहे. व्हॅाट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.221 मध्ये हे नवीन फिंगरप्रिंट लॅाकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॅाट्सअॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होईल. यानंतर युजर्स आपले फिंगर प्रिंट रजिस्टर करु शकणार आहे.
अँड्रॉइड बीटापूर्वी व्हॉट्सअॅपने हे फिचर्स आयओएसला उपलब्ध करुन दिले. त्याचप्रमाणे तीन महिन्यानंतर आयओएस युजर्संना व्हॅाट्सअॅप सुरक्षितेसाठी फेस आयडी व टच आयडीची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. तसेच व्हॅाट्सअॅपचे कोणतेही नवीन फीचर्स येणार असेल तर ते सर्वात प्रथम अँड्रॉइड युजर्सला उपलब्ध केला जातो. त्यानंतर आयओएस यूजर्सला ते फीचर्स दिले जाते, त्यामुळे आयओएसला प्रथम कोणतेही नवीन फीचर्स उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे.