Fire Boltt ने भारतात व्हॉइस असिस्टंट सपोर्ट असलेला नवीन स्मार्टवॉच Fire Boltt AI सादर केला आहे. या Smartwatch मध्ये व्हॉइस असिस्टंट, ब्लूटूथ कॉलिंग अशा आकर्षक फीचर्ससह हार्ट रेट ट्रॅकर, SpO2 मॉनिटर असे हेल्थ फीचर्स देखील देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया फायर-बोल्ट एआय स्मार्टवॉचची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
Fire Boltt AI चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
Fire Boltt AI स्मार्टवॉच गुगल/सिरी व्हॉइस असिस्टंटसह येणारा पहिला स्मार्टवॉच आहे. या फिचरच्या मदतीने वेदर अपडेट मिळवता येतात, म्यूजिक कंट्रोल करता येते आणि इतर टास्क देखील बोलून करता येतात. या वॉचमधील बिल्ट-इन स्पीकर आणि माईकमुळे ब्लूटूथ कॉलिंगचा वापर करता येतो.
Fire Boltt AI मध्ये 240x280 पिक्सल रिजॉल्यूशन असलेला 1.7-इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉच हार्ट रेट, ब्लड-ऑक्सीजन सॅचुरेशन (SpO2), स्ट्रेस, झोप, रक्तदाब आणि मनुस्ट्रल सायकल ट्रॅक करू शकतो. हा डिवाइस 10 स्पोर्ट्स मोड देखील ट्रॅक करतो.
ज्या स्मार्टफोनशी हा स्मार्टवॉच कनेक्ट केला जाईल त्यावरील म्युजिक आणि कॅमेरा देखील वॉचमधून नियंत्रित करता येईल. तसेच यात अलार्म, टायमर, रिमाइंडर, वेदर अपडेट, ब्राईटनेस कंट्रोल आणि मल्टीपल वॉच फेस असे बेसिक स्मार्टवॉच फंक्शन देखील मिळतात. कंपनीने यात IP67 डस्ट अँड वॉटर रेजिस्टन्स दिला आहे. Fire Boltt AI स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये 10 दिवस चालू शकतो.
Fire Boltt AI ची किंमत
Fire Boltt AI ची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच उद्यापासून ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि पिंक कलरमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.