Fire Boltt Smartwatch: Fire-Boltt Almighty स्मार्टवॉच भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात SpO2, हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर ट्रॅक करण्याची सुविधा मिळते. चला जाणून घेऊया Fire-Boltt Almighty स्मार्टवॉचचे हेल्थ फीचर्स, किंमत आणि अन्य स्पेक्स.
Fire-Boltt Almighty ची किंमत
हा स्मार्टवॉच Flipkart वरून 4999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु अजूनही हा Coming Soon दाखवला जात आहे. या डिवाइसची MRP मात्र 14999 रुपये आहे. कंपनीनं या स्मार्टवॉचचे Black, Blue, Brown, Black/Brown, Matte Black आणि Orange असे 6 कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.
Fire-Boltt Almighty चे स्पेसिफिकेशन्स
सर्वप्रथम Fire-Boltt Almighty चे हेल्थ फीचर्स पाहू. यात SpO2 सेन्सर मिळतो, जो रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सांगण्यास मदत करतो. तसेच यात स्लीप ट्रॅकिंग, इंटीग्रेटेड ब्रीद मोड आणि स्ट्रेस मॅनेजमेंट सारखे फिचर मिळतात. तसेच या स्मार्टवॉचचा वापर हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर ट्रॅक करण्यासाठी देखील करता येतो. याची बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यावर 20 दिवसांपर्यंत चालू शकते.
Fire-Boltt Almighty मध्ये 1.4 इंचाची AMOLED टच स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिवाइस डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससाठी IP67 रेटिंगसह बाजारात आला आहे. यात ब्लूटूथ कॉलिंग फीचर देण्यात आलं आहे, यासाठी स्मार्टवॉच इन-बिल्ट स्पिकर आणि मायक्रो फोन मिळतो. Fire-Boltt Almighty स्मार्टवॉच 11 स्पोर्ट्स मोड जसे कि सायकलिंग आणि वॉकिंगला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा:
कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल
खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट