Fire-Bolt च्या Ninja सीरिजमध्ये नवीन ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचची भर पडली आहे. हे स्मार्टवॉच सध्या अॅमेझॉनच्या माध्यमातून विकत घेता येईल. कंपनीनं याची किंमत 2,999 ठेवली आहे. तुम्ही या स्मार्टवॉचची खरेदी व्हाईट, ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड या चार व्हेरिएंटमध्ये करता येईल. चला जाणून घेऊया या स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 450nits पीक ब्राईटनेस आणि 240x280 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यातील कॉलिंग फीचर्समध्ये Quick Dial पॅड, कॉल हिस्ट्री, बिल्ट-इन माईक आणि स्पीकर सपोर्ट मिळतो. या स्मार्टवॉचच्या उजवीकडे असलेल्या रोटेटेबल क्राऊनच्या मदतीनं हे वॉच कंट्रोल करता येईल.
वॉकिंग, रनिंग आणि सायकलिंग सारखे 30 स्पोर्ट्स मोड्स या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टवॉचमध्ये SpO2 सेन्सर देखील देण्यात आला आहे, जो ऑक्सीजन मॉनिटरिंग करतो. यातील इनबिल्ट गेमिंग फिचर या स्मार्टवॉचची खासियत म्हणता येईल.
हे देखील वाचा:
- घायाळ करणाऱ्या डिजाईनसह आला सर्वात पावरफुल Smartphone; इतकी आहे Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro ची किंमत
- Sony च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह येणार Poco चा स्मार्टफोन; कमी किंमतीत पावरफुल प्रोसेसरची जोड
- चार्जिंगचं झंझटच नाही! सिंगल चार्जवर 60 तास चालणार ‘हे’ ब्लूटूथ इयरफोन्स; 999 मध्ये शानदार साऊंड क्वॉलिटी