Fire Boltt Talk 2 नावाचं नवीन Smartwatch लाँच झालं आहे. यात ब्लूटूथ कॉलिंग, 60 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आणि SpO2 मॉनिटर असे जबरदस्त फिचर देण्यात आले आहेत. याची किंमत कंपनीनं 2499 रुपये ठेवली आहे. हा घड्याळ तुम्ही ब्लॅक, ब्लू, व्हाईट, ग्रेईं आणि रोज गोल्ड कलर्समध्ये अॅमेझॉन इंडियावरून विकत घेऊ शकता.
स्पेसिफिकेशन
या वॉचमध्ये 1.28 इंचाचा वर्तुळाकार डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 240x240 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. वॉचला प्रीमियम लूक देण्यासाठी मेटल केसिंगचा वापर करण्यात आला आहे. कडेला देण्यात आलेल्या दोन क्राउन बटन वॉचच्या मेन्यूमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी मदत करतात. तसेच व्हॉईस असिस्टंट फीचर असल्यामुळे अनेक फिचर फक्त आवाजाने वापरता येतात.
या वॉचमध्ये SpO2 मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग सेन्सर असे हेल्थ आणि फिटनेस फिचर देण्यात आले आहेत. सोबत 60-स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. कंपनीनं IP68 डस्ट आणि वॉटर प्रूफ रेटिंगसह हे वॉच सादर केलं आहे, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून याचं संरक्षण होतं. वॉचमधील व्हॉईस असिस्टंटच्या मदतीनं तुम्ही म्यूजिक प्ले, कॉलिंग इत्यादी गोष्टी करू शकता. वॉचमधील बॅटरी आणि चार्जिंगची माहिती कंपनीनं दिली नाही.
फायर बोल्ट टॉक 2 मध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील देण्यात आलं आहे. त्यासाठी बिल्ट-इन माईक आणि स्पिकर देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोन सोबत पेयर केल्यानंतर तुम्ही फक्त वॉच वापरून कॉल करू आणि रिसिव्ह करू शकता. तसेच क्विक डायल पॅड, रीसेंट कॉल आणि कॉन्टॅक्ट हे ऑप्शन देखील मिळतात.