Fire-Boltt Talk स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर भारतात लाँच झाला आहे. या डिवाइसमध्ये ब्लूटुथ कॉलिंग फीचर पण देण्यात आले आहे. हा IPX7 वॉटरप्रूफ सर्टीफिकेशनसह येतो. ब्लूटुथ वॉइस आणि कॉल मोड अॅक्टिव्ह असल्यास पाच दिवस तर नॉर्मल मोडमध्ये 10 दिवसांचा बॅकअप हा वॉच शकतो.
Fire-Boltt Talk किंमत
Fire-Boltt Talk 4,999 रुपयांमध्ये फक्त Flipkart वर उपलब्ध झाला आहे. परंतु, सध्या याची किंमत 4,499 रुपये दिसत आहे. हा स्मार्टवॉच ब्लॅक, ग्रीन आणि ग्रे रंगात लाँच केला गेलाआहे.
Fire-Boltt Talk चे स्पेसिफिकेशन
Fire-Boltt Talk या किंमतीती ब्लूटुथ वॉइस आणि कॉल असिस्टेंस फीचर देणारा हा पहिला वॉच आहे. Bluetooth v5 असल्यामुळे या वॉचद्वारे अँड्रॉइड आणि आयओएसमधून म्यूजिक देखील कंट्रोल करता येईल. फक्त iOS मध्ये कॉलिंग फीचरला सपोर्ट मिळणार नाही. डिवाइसमध्ये 44mm Bevel Curved Glass सह 3D HD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात सिलिकॉन स्ट्रॅपसह स्टेनलेस स्टील बॉडी देण्यात आली आहे. यात नेविगेशनसाठी एक बटण देण्यात आले आहे.
या वॉचची बॅटरी 120 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते. या वॉचचा स्टॅन्डबाय टाइम 30 दिवस आहे, असे कंपनीने सांगितले आहे. या फिटनेस ट्रॅकरमध्ये एक्सेलरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, SpO2 स्कॅनर आणि ऑप्टिकल हर्ट रेट सेन्सर देखील देण्यात आला आहे. रनिंग, सायकलिंग, वॉकिंग, स्किपिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि स्विमिंग असे अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.