शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आताच्या या प्रसिद्ध मोबाईल कंपन्यांचं पहिलं प्रॉडक्ट काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:31 IST

आज मोबाईलच्या विश्वात वरच्या स्थानावर नाव घेतल्या जाणा-या अनेक कंपन्यां ह्या जरी त्यांच्या मोबाईलमुळे ओळखल्या जात असतील तरी या कंपन्यांचे पहिले प्रॉडक्ट हे मोबाईल नव्हते.

आज मोबाईलच्या विश्वात वरच्या स्थानावर नाव घेतल्या जाणा-या अनेक कंपन्यां ह्या जरी त्यांच्या मोबाईलमुळे ओळखल्या जात असतील तरी या कंपन्यांचे पहिले प्रॉडक्ट हे मोबाईल नव्हते. दूरसंचार क्षेत्रात भलेही मोटोरोलाने क्रांति आणली होती, पण या कंपनीच पहिलं प्रॉडक्ट मोबाईल नव्हतं. आज ज्या कोणत्या लोकप्रिय कंपन्या आहेत त्यांचे पहिले प्रॉडक्ट काय होते याची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय.

१) सोनी:

सोनी कंपनीचं पहिलं प्रॉडक्ट १९४० सालच्या शेवटी आलं होतं. त्यांनी इलेक्ट्रिकल राईस कुकर होता. हा कुकर एका लाकडाच्या टबखाली जोडल्या गेलेल्या अ‍ॅल्यूमिनिअम इलेक्ट्रॊड द्वारे बनवण्यात आला होता. या प्रॉडक्टची सर्वात मोठी खामी ही होती की, यात राईस पूर्णपणे शिजत नव्हता. तर कधीकधी जास्त शिजत होता. या कंपनीचं हे पहिलंच प्रॉडक्ट अयशस्वी ठरलं होतं.

२) मोटोरोला:

मोटोरोलाने त्यांची सुरूवात Galvin Manufacturing Corporation या नावाने सुरू केली होती. कंपनीने त्यांचं पहिलं प्रॉडक्ट १९२८ साली आणलं होतं. ते एक बॅटरी एलिमीनेटर होतं. बॅटरी एलिमीनेटरचं पेटंट Paul V Galvin यांनी Stewart Battery Company, Chicago कडून विकत घेतलं होतं. १९४७ मध्ये Galvin Manufacturing Corporation ही कंपनी Motorola, Inc. रूपात बदलली.

३) एलजी:

१५ नोव्हेंबर १९५९ ला एलजीने(जुनं नाव Lucky GoldStar) त्यांचं पहिलं प्रॉडक्ट लोकांसमोर आणलं होतं. त्यांनी एक र्डिओ तयार केला होता. हे कोरियातील लोकांसाठी पहिलं इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट होतं. या ऎतिहासिक घटनेनंतर कोरियात इलेक्ट्रॉनिक हा शब्द वापरला जाऊ लागला.

४) माईक्रोसॉफ्ट:

१९८३ साली आलेल्या माईक्रोसॉफ्टचं पहिलं प्रॉडक्ट होतं PC-compatible ग्रीन आई माऊस. जगभरात लोकप्रिय असलेल्या या कंपनीने त्यांची सुरूवात एका माऊसची निर्मिती करून केली होती.

५) एचपी(Hewlett-Packard) :

एचपी या कंपनीचं पहिलं उत्पादन एक resistance-capacitance audio oscillator होतं. ज्याचा उपयोग ध्वनी उपकरणांच्या परीक्षणासाठी केलं जात होतं. हे उत्पादन १९३८ मध्ये आणलं गेलं होतं. तेव्हा या प्रॉडक्टचं नाव HP मॉडल 200A असं होतं.

६) नोकिया:

नोकियाचं पहिलं गॅजेट एक कार फोन होता. ज्याला १९८२ मध्ये Mobira Senator नावाने लॉन्च करण्यात आलं होतं. याचं वजन साधारण ९.८ किलो ग्रॅम इतकं होतं.

७) सॅमसंग:

सॅमसंगची स्थापना १९३८ मध्ये Lee Byung-chull यांनी केली होती. पण सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स पूर्णपणे १९६९ मध्ये उभी झाली. त्यांचं पहिलं प्रॉडक्ट १२ इंचचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट टीव्ही आणला होता. हा टीव्ही १९७२ मध्ये आणला गेला होता.

८) लेनोव्हे:

लेनोव्होने त्यांची सुरूवात १९८७ मध्ये एका चायनीज कॅरेक्टर कार्ड या प्रॉडक्टने केली होती. या कार्डचं काम इंग्लिश भाषेच्या ऑपरेटींग सिस्टीमचा चायनीज भाषेत अनुवाद करण्याचं होतं. या प्रॉडक्टचं नाव legend286 असं होतं. या उत्पादनसाठी लेनोव्होला नॅशनल अवॉर्डही मिळालं होतं.

९) डेल:

डेलने १९८५ मध्ये १० मेगाबाइट पर्सनल कम्प्युटर, टर्बो पीसी तयार केला होता. ज्याची किंमत ७९५ डॉलर इतकी होती. या प्रॉडक्टमुळे आयबीएमने त्यांच्या मशीन्सच्या किंमती घटवल्या होत्या. १९८८ मध्ये कंपनीने आपले नाव बदलून Dell Computer Corp असे केले होते.

१०) अ‍ॅपल:

अ‍ॅपलच्या पहिल्या प्रॉडक्टचं नाव अ‍ॅपल १ असं होतं. हे १९७६ मध्ये अ‍ॅपलचे सह-संस्थापक Steve Wozniak यांनी Steve Jobs यांच्या गॅरेजमध्येच डिझाईन केलं होतं. हे प्रॉडक्ट विकत घेणारे काही मोजकेच लोक होते. त्यातील एक होता Paul Terrell. हा एक Electronics retailer Byte दुकानाचा मालक होता. त्याने ५० डिवाईस विकत घेतले होते. आणि ते प्रत्येक ६६६.६६ डॉलरला विकले होते. त्यानंतर कंपनीने १५० डिवाईस आणखी तयार केले. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल