शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Micromax In 1b चा पहिला सेल थोड्याच वेळात; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 11:37 AM

मायक्रोमॅक्सच्या मोबाईलचा पहिला सेल असल्याने याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या वेबसाईटवर हा सेल सुरु होणार आहे.

मोठ्या काळानंतर भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारात पुनरागमन केले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला ऑनलाईन इव्हेंटमध्ये कंपनीने दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यापैकी सर्वात स्वस्त Micromax In 1b या फोन चा आज फ्लॅश सेल फ्लिपकार्टवर आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये काही ऑफर्स लागू असणार आहेत. 

मायक्रोमॅक्सच्या मोबाईलचा पहिला सेल असल्याने याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या वेबसाईटवर हा सेल सुरु होणार आहे. या फोनचे दोन व्हेरिअंट आहेत. Micromax In 1B ला 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेजसह बाजारात आणण्यात आला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरे व्हेरिअंट 2 जीबी रॅम  32 जीबी स्टोरेजचे आहे. याची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Micromax In 1B ची किंमत खूपच परवडणारी ठेवण्यात आली आहे. 6.5 इंचाचा HD+ रिझोल्युशन डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. माठीमागे 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. टाईप सी चार्जिंग कनेक्टिविटी देण्यात आली आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. 

ऑफर्स काय? लाँच ऑफरद्वारे Flipkart वर या फोनवर अॅक्सिस बँकेच्या कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. याशिवाय नो कॉस्ट ईएमआय देखील मिळणार आहे. 

Micromax In Note 1 देखील बाजारातMicromax In Note 1 मध्ये 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रिझोल्युशनसह देण्यात आला आहे. हे डिव्हाईस MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. गेमिंग करणाऱ्या युजरसाठी तो चांगला परफॉर्मन्स देतो. कॅमेरा सेटअप- AI क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 5 एमपी अल्ट्रा वाईड, २ एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Micromaxमायक्रोमॅक्सFlipkartफ्लिपकार्टMobileमोबाइल