वियरेबल्स ब्रँड Fitbit ने आपला लेटेस्ट फिटनेस ट्रॅकर Fitbit Charge 5 भारतात लाँच केला आहे. या नव्या फिटनेस ट्रॅकरमध्ये कंपनीने अनेक महत्वाचे आणि उपयुक्त सेन्सर्स दिले आहेत. यात ECG आणि EDA सेन्सरचा समावेश आहे. यात सात दिवसांच्या बॅटरी लाईफसह AMOLED कलर टचस्क्रीन देण्यात आली आहे.
Fitbit Charge 5 चे स्पेसिफिकेशन्स
Fitbit Charge 5 मध्ये 1.04-इंचाचा कलर अॅमोलेड टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक अल्वेज ऑन डिस्प्ले आहे. पर्सनलायजेशनसाठी यात 20 कलरफुल वॉच फेस देण्यात आले आहेत. शरीरातील ऑक्सिजनचा स्थर मोजण्यासाठी यात SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात स्किन टेम्परेचर सेन्सर आणि हार्ट रेट मॉनिटर देखील देण्यात आला आहे. शरीरातील स्ट्रेस लेव्हल मोजण्यासाठी यात EDA सेन्सर मिळतो. यातील ECG फिचर लाँच नंतर काही दिवसांनी अॅक्टिव्हेट करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.
Fitbit Charge 5 मध्ये बिल्ट-इन GPS + GLONASS आणि NFC देखील आहे. हा ट्रॅकर 50 मीटर पर्यंत वॉटर-रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. दोन तासांत फुलचार्ज होणारा हा बँड 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. ब्लूटूथ द्वारे हा डिवाइस iOS 12.2 आणि अँड्रॉइड 8.0 आणि त्यावरील Apple आणि Android डिवाइससह कनेक्ट करता येईल. तुम्ही तुमची आरोग्यविषयक माहिती फिटबीटच्या अॅपमधून मिळवू शकता.
Fitbit Charge 5 ची किंमत
Fitbit Charge 5 ची भारतातील 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फिटनेस ट्रॅकर तीन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध होईल. भारतासह जगभरात सादर झालेल्या या फिटनेस बँडची प्री बुकिंग अनेक ठिकाणी सुरु करण्यात आली आहे. Fitbit Charge 5 सोबत तुम्हाला सहा महिन्यांचे फिटबिट प्रीमियम सब्स्क्रिप्शन मोफत मिळेल.