25 जुलैपासून Flipkart Big Saving Days ची सुरुवात होणार आहे, हा सेल 29 जुलैपर्यंत सुरु राहील. 5 दिवसांच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रोनिक्सवर विविध डील्स आणि डिस्काउंट मिळेल. Flipkart Plus सदस्यांसाठी हा सेल 24 जुलैपासूनच सुरु होईल. या सेलमध्ये अॅप्पल आयफोन्सवर 11,900 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येईल. काही इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यतची सूट मिळू शकते. (Flipkart Big Saving Days sale dates, top mobile deals announced)
Flipkart ने यावर्षीच्या Big Saving Days सेलची घोषणा केली आहे. 2021 मधील हा सेल 25 जुलैला सुरु होऊन पाच दिवस सुरु राहिल्यानंतर 29 जुलैला संपेल. Flipkart Plus युजर्ससाठी हा सेल 24 जुलैपासून सुरु होऊ शकतो. या सेलमध्ये ICICI बँकेच्या कार्ड्सने खरेदी, नो-कोस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरवर देखील 10 टक्क्यांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये लॅपटॉप्स, हेडफोन्स, साउंडबार, टॅबलेट्स इतरायडींवर 80 टक्के, निवडक लॅपटॉप्सवर 40 टक्केआणि हेडफोन्सवर 70 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. तसेच निवडक टीव्ही मॉडेल्स 65 टक्क्यांपर्यतच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील. या सेलमध्ये AC, वॉटर प्युरिफायर, स्वछता उपकरणे आणि वॉशिंग मशीनवर देखील चांगली सूट मिळेल.
Flipkart Big Saving Days 2021 मध्ये Realme C20 स्मार्टफोन 500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. 18,999 रुपयांचा Poco X3 Pro स्मार्टफोन 17,249 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. Realme X7 5G स्मार्टफोन 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. Moto G40 Fusion फोनच्या किंमतीवर देखील 1000 रुपयांची सूट देण्यात येईल.
यावर्षीच्या फ्लिपकार्ट बिग सेविंग डेजमध्ये अॅप्पल आयफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळेल. 39,900 तुप्यांच्या iPhone SE (2020) स्मार्टफोन या सेलमध्ये 28,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तर iPhone XR स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 47,900 रुपयांच्या ऐवजी 37,999 रुपये होईल. तसेच गेल्यावर्षी लाँच झालेल्या Apple चा फ्लॅगशिप iPhone 12 स्मार्टफोन 79,900 रुपयांच्या ऐवजी 67,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.