Flipkart Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टनं यंदाच्या पहिल्या सेलचं आयोजन केलं आहे. Flipkart Big Saving Days Sale आज म्हणजे 17 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत सुरु राहील. सेलमध्ये रियलमी, सॅमसंग आणि ओप्पोच्या अनेक स्मार्टफोन्सवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. काही फोन्स EMI वर देखील विकत घेता येतील. तसेच ICICI बँकेच्या कार्डनं पेमेंट केल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल.
Flipkart Sale Best Smartphones Deals
Infinix Note 11S
Infinix Note 11s स्मार्टफोनची किंमत 12999 रुपयांपासून सुरु होते. यात 6.95 इंचाचा Full HD+ डिस्प्ले मिळतो. MediaTek Helio G96 प्रोसेसर आला हा फोन 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह विकत घेता येईल. यात 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी मिळते.
Realme Narzo 30
या फोनची किंमत 13499 रुपयांपासून सुरु होते. यात 6.5 इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek Helio G95 प्रोसेसर असलेल हा फोन 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. डिवाइसमध्ये 48MP क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळते.
Oppo A53s
Oppo A53s हा स्मार्टफोन फक्त 555 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणता येईल. ज्याची किंमत 15990 रुपयांपासून सुरु होते. यात 6.52 इंचाचा डिस्प्ले, 13MP ट्रिपल रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसर मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
Realme 8
Realme 8 देखील 555 रुपयांच्या ईएमआयवर उपलब्ध आहे. या फोनची किंमत 15450 रुपयांपासून सुरु होते. यात 6.4 इंचाचा डिस्प्ले, 64MP क्वॉड रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि MediaTek Helio G95 प्रोसेसर मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे.
Samsung Galaxy F22
या फोनमध्ये 6.4 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek Helio G80 प्रोसेसर असलेला हा स्मार्टफोन 6GB पर्यंत RAM, 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. 48MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असलेला हा फोन 6000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो. सेलमध्ये हा फोन ICICI बँकेच्या कार्डनं 10 टक्के डिस्काउंटसह विकत घेता येईल. 11999 रुपयांच्या या स्मार्टफोनवर 11200 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.
हे देखील वाचा:
मोबाईलवर फोटो क्लिक करा; घरबसल्या जिंका सोनं आणि भरघोस बक्षीसं, पाहा कसं