Flipkart आपल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड MarQ अंतर्गत नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. हा स्मार्टफोन 25 सप्टेंबरला भारतात सादर केला जाईल. हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन असेल जो एंट्री लेव्हल किंमतीत MarQ M3 Smart नावाने लाँच केला जाईल. या फोनसाठी प्रोडक्ट पेज देखील ईकॉमर्स साईटवर लाईव्ह करण्यात आले आहे. हा फोन रिलायन्सच्या Jio Phone Next 4G ला टक्कर देऊ शकतो.
MarQ
MarQ हा फ्लिपकार्टचा सब-ब्रँड आहे, जो टेलिव्हिजन, साउंडबार, वॉशिंग मशीन, एसी आणि मायक्रोवेव्ह असे होम अप्लायन्सेस बनवतो. त्याचबरोबर या ब्रँड अंतर्गत जैसे TurboStream Android TV स्टिक, Falkon Aerbook नोटबुक आणि TWS इयरबड्स देखील लाँच करण्यात आले आहेत. आता प्रथमच कंपनी स्मार्टफोन सेगमेंटमध्ये MarQ M3 Smart च्या माध्यमातून पाऊल टाकत आहे.
MarQ M3 Smart
फ्लिपकार्टने शेयर केलेल्या पोस्टरनुसार MarQ M3 Smart स्मार्टफोनमध्ये वाटरड्रॉप नॉच देण्यात येईल. हा फोन जुन्या बेजल असलेल्या डिजाईनसह सादर केला जाईल. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार, MarQ M3 Smart फोनमध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशनसह सादर केला जाईल. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळेल. या मार्कक्यू फोनमधील 32GB स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येईल.
फ्लिपकार्टचा आगामी स्मार्टफोन MarQ M3 Smart आगामी बिग बिलियन डेज सेल दरम्यान सादर केला जाईल. हा सेल 7 ते 12 ऑक्टोबर या दरम्यान सुरु राहील. या फोनची किंमत 10,000 रुपयांच्या आत असू शकते. या स्मार्टफोन्ससह इतर कंपन्या देखील आपले स्मार्टफोन या सेलमध्ये सादर करणार आहेत.