वनप्लसने नुकताच OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच केला होता. त्याचा आज सेल सुरु झाला आहे. यामुळे कंपनीने तिचा लोकप्रिय स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अॅमेझॉनवर विकले जात आहेत.
OnePlus Nord CE 3 Lite 5G: वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन लाँच झाला; 108MP कॅमेरा, बस फोटोच काढत रहाल...
वनप्लसचा जो लोकप्रिय फोन होता, त्याची किंमत देखील नव्या फोन एवढीच म्हणजे 19,999 रुपये होती. परंतू या किंमतीत 6 जीबी रॅमवाला व्हेरिअंट मिळत होता. आता वनप्लसने आठ जीबी रॅमवाला व्हेरिअंट लाँच केला आहे, तो देखील डिस्काऊंटवर १८९९९ रुपयांना मिळत आहे. यासोबतच ईएमआय ऑफर देण्यात आली आहे. यानुसार कमीतकमी ईएमआय ९०८ रुपये महिना असा ठेवण्यात येणार आहे.
तुमच्याकडे जुना फोन असेल तर एक्स्चेंजमध्ये तुम्हाला 17,800 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे. जर तुम्हाला पूर्ण डिस्काऊंट मिळाला तर तुम्ही हा फोन ११९९ रुपयांना खरेदी करू शकता. OnePlus Nord CE 3 Lite 5G साठी कंपनीने लोकप्रिय फोन OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत घटविली आहे.
दोन्ही फोन कंपेअर केले तर त्यात कॅमेरा वेगळा आहे. Nord CE 3 Lite मध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेरा आहे, तर Nord CE 2 Lite मध्ये ६४ मेगापिक्सल कॅमेरा आहे. Nord CE 3 Lite मध्ये 67W SUPERVOOC चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे. तर Nord CE 2 मध्ये 33W SuperVOOC चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे.